नागपुरात शुक्रवारी ७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद; लसिकरणाचा सपाटा सुरुच

    नागपूर (Nagpur): शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येचा आलेख चढ-उतार होताना दिसून येत आहे. नागपूर मनपाच्या आरोग्य विभागातर्फे शुक्रवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार शहरात 07 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या नोंदविण्यात आली. हा आकडा गुरुवारी आढळून नागपूर जिल्ह्यातील रुग्णसंख्येच्या तुलनेत निम्मा आहे. चिंतेची बाब म्हणजे, शहरात कोरोना ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या पन्नाशीखाली आलेली नाही. शुक्रवारी 58 कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण आढळून आले.

    कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी आरोग्य विभाग सर्वोपरी प्रयत्न करीत आहे. याचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून शहरात शुक्रवारी 8 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाल्याची नोंद करण्यात आली. आजपर्यंत 3 लाख 34 हजार 330 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. मनपाच्या रुग्णालयांकडून कोरोना टेस्टिंगचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. शुक्रवारी 3618 कोरोना संशयित रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली. यापैकी 3606 चाचण्यांचा अहवाल निगेटिव्ह आढळून आला. कोरोनामुळे आज एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

    कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखायची असेल तर कोरोना लसिकरणाची संख्या वाढविण्याची गरज असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले. या पार्श्वभूमीवर मनपाच्या लसिकरण केंद्रांवर शुक्रवारी 14 लाख 4 हजार 318 नागरिकांना कोरोनाची पहिली लस टोचण्यात आली. याशिवाय 6 लाख 83 हजार 619 नागरिकांना कोरोनाची दुसऱ्या क्रमांकाची लस टोचली गेली. आज एकूण 20 लाख 87 हजार 937 नागरिकांना कोरोनाची लस टोचण्यात आली.