बिबट्याचे नागपुरात स्थानपरिवर्तन; आयटी पार्क परिसरातील बिबट्या पोहोचला महाराजबागेजवळ; वनविभागाने प्राणिसंग्रहालयात लावला ट्रॅप

नागपुरातील आयटी पार्क परिसरात (the IT Park area of ​​Nagpur) आढळलेला बिबट्या (The leopard) आता चक्क महाराजबाग परिसरापर्यंत (Maharajbagh area) येऊन पोहोचला आहे. वनविभागाने (The Forest Department) त्याला पकडण्यासाठी विविध ठिकाणी पिंजऱ्यात कोंबड्या कोंडल्या आहेत. मुख्य म्हणजे, नागपुरालगतच्या विरळ जंगलात आढळणारा हिंस्त्र प्राणी शहरात कसा काय शिरला, हा प्रश्नच आहे.

    नागपूर (Nagpur). शहरातील आयटी पार्क परिसरात (the IT Park area of ​​Nagpur) आढळलेला बिबट्या (The leopard) आता चक्क महाराजबाग परिसरापर्यंत (Maharajbagh area) येऊन पोहोचला आहे. वनविभागाने (The Forest Department) त्याला पकडण्यासाठी विविध ठिकाणी पिंजऱ्यात कोंबड्या कोंडल्या आहेत. मुख्य म्हणजे, नागपुरालगतच्या विरळ जंगलात आढळणारा हिंस्त्र प्राणी शहरात कसा काय शिरला, हा प्रश्नच आहे. महाराजबाग परिसरातील सुरक्षा व्यवस्था आणि गस्त वाढविली आहे.

    पकडण्यासाठी लावण्यात आले पिंजरे
    दरम्यान, या बिबट्याला पकडण्यासाठी त्याच्या मार्गावर विविध ठिकाणी पिंजरे ठेवण्यात आलेय. या पिंज-यांमध्ये कोंबड्या ठेवण्यात आल्यात आहेत. शिवाय ट्रॅप कॅमेरेही वाढविण्यात आले आहे. साधरणपणे उन्हाळ्यात वन्यजीव प्रेमी सफारीसाठी जंगलाकडे जातात. मात्र लॉकडाऊनमुळं सध्या सफारी बंद आहे. वन्यप्रेमी घरात आहे. मात्र आता एक बिबट्याच नागपूर शहरात पोहचला आहे. तोच शहारत गेल्या चार दिवसांपासून सफारी करत असल्याचं चित्र आहे.

    शुक्रवारी गायत्रीनगर परिसरात हा बिबट्या पहिल्यांदा दिसला होता.त्यानंतर आय़टी पार्कमध्ये त्याचा वावर सीसीटीव्हीत चित्रीत झाला होता. मात्र दोन दिवस त्यांच्या वास्तवाचे पुरावे न दिसल्याने हा बिबट्या अंबाझरी जैविविधता उद्यानाकडे परल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र सोमवारी सर्वांनाच धक्का बसला.

    बजाजनगर परिसरात बिबट्याा दिसल्याचं समोर आलं. त्यानंतर गायत्रीनगरपासून आयटीपार्क, व्हीएनआटी, बजाजरनगर अशी भ्रमंती करत हा बिबट्या सोमवारी चक्क महाराजबाग प्राणीसंग्रहालय परिसरात दिसल्यानं एकच खळबळ उडाली आहे..तो महाराजबाग नजिकच्या एका पुलाच्या कठड्यावर दिसला.त्यानंतर त्याच्या शोधासाठी या परसिरात मोठी मोहिम वनविभागानं राबवली नाही. मात्र पुन्हा या बिबट्यानं हुलकावणी दिली.

    त्याचे हा परिसरात पगमार्कही शोधण्यात आले. दरम्यान यानंतर महाराजबाग परिसरात सुरक्षा वाढविण्यात आली आहे. शहरात इतक्या आतपर्यंत हा बिबट्या पोहचल्यानं नागरिकांमध्ये मात्र चांगलीच खळबळ उडालेली आहे. सर्वांचेच अंदाज चुकवत आणि गुंगारा देत या बिबट्याचा शहरातील वावर आता चिंता वाढवणारा आहे.