nagpur wardha road sai mandir encroachment

नागपूर. वर्धा मार्गावरील (wardha road) साई मंदिर (sai mandir)  परिसरात काही दिवसांपूर्वी हायकोर्टाच्या (high court) निर्देशावर अतिक्रमण (encroachment) हटविण्याची कारवाई करण्यात आली होती. कारवाईमध्ये परिसरात अनेक वर्षांपासून असलेले फूल- प्रसाद विक्रेत्यांची दुकाने हटविण्यात आली. दुकानदारांनी कारवाईविरुद्ध हायकोर्टात याचिका दाखल केली होती. गुरुवारी पुन्हा सुनावणीदरम्यान कोर्टाला आतापर्यंत अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईची माहिती देण्यात आली. दुकानदारांनी कारवाई विरुद्ध हायकोर्टात याचिका दाखल केली होती. गुरुवारी पुन्हा सुनावणीमध्ये कोर्टाला आतापर्यंत झालेल्या अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईची माहिती देण्यात आली. कोर्टाने उर्वरित अतिक्रमणही येत्या 3 दिवसांमध्ये पूर्णतः हटविण्याचे निर्देश दिले. कोर्टाच्या आदेशामुळे आता परिसरातून अतिक्रमणाचा पूर्णतः सफाया होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पार्किंगसाठीच व्हावा उपयोग
उल्लेखनीय आहे की, साई मंदिर ट्रस्टतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले होते की, परिसरात अतिक्रमणामुळे येणाऱ्या भाविकांना बाहेर रस्त्यावर व गल्लीमध्ये आपले वाहन पार्क करावे लागतात. परिसरातील जागा मोकळी झाल्यास त्याचा उपयोग पार्किंगसाठी केला जाऊ शकेल. यावर न्यायालयाने ट्रस्टकडून हे आश्वासनही घेतळे आहे की, आता अतिक्रमणातून मुक्‍त झालेल्या जागेचा उपयोग पार्किंगसाठीही करण्यात येईल.