reality of engineers

  • बदल स्वीकारण्याची मानसिकता नाही
  • मुलांइतकेच पालकही जबाबदार

नागपूर. देशात दरवर्षी सुमारे साडेदहा लाखांहून अधिक इंजिनीअर पदवीधर तयार होतात. त्यापैकी ९० टक्के इंजिनियर (engineers)  हे फक्त नावाचेच (useless) असून केवळ सात टक्के पदवीधर कोअर इंजिनीअरिंगसाठी आणि तीन टक्‍के आयी क्षेत्रासाठी रोजगारक्षम असतात, असा धक्कादायक अहवाल (research) दिल्लीतील एका एजन्सीने केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकरिता केलेल्या पाहणीतून समोर आला आहे. बारावीनंतर अभियांत्रिकीकडे वळणारा मोठा वर्ग आपल्याकडे आहे, त्यामुळे महाराष्ट्रासह देशभरातील इंजिनीअरिंग कॉलेजांमधील शैक्षणिक दर्जावर मोठे प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. केंद्र सरकारच्या नियंत्रणातील आयआयटी, एनआयटी आणि इतर अभिमत इंजिनीअरिंग कॉलेज वगळता विद्यापीठ संलग्नित इंजिनीअरिंग कॉलेजांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. त्यामुळे राष्ट्रीय रँकिंगमध्येदेखील रोजगारक्षमता निर्माण करण्याच्या निकषावर देशातील बोटावर मोजण्याइतक्या संस्थांचा समावेश असल्याचे आढळून आले आहे.

शिक्षणसंस्था विद्यार्थ्यांकडून वारेमाप फी वसूल करते. परंतु, पदवी मिळाल्यावर नोकरी मिळेलच, त्याची हमी नाही. परिणामी, सुशिक्षित बेरोजगारांची फौज तयार होत असल्याचे चित्र या पाहणीतून समोर आले आहे. इंजिनीअरिंगला प्रवेश घेणाऱ्या सुमारे ९७ टकके विद्यार्थ्यांना आयटी क्षेत्रातच नोकरी मिळावी, अशी अपेक्षा असल्याचे ‘पाहणीत आढळून आले. त्यापैकी केवळ तीन टकके विद्यार्थ्यांमध्येच आयटी क्षेत्रात नोकरीसाठी आवश्यक कौशल्य असल्याचे दिसून आले. तर सात टक्के  विद्यार्थी कोअर इंजिनीअरिंगकरिता रोजगारक्षम आहेत. दरवर्षी सॉफ्टवेअर कंपन्या मोठ्या संख्येने कॅम्पसमधून विद्यार्थ्यांना निवडतात. परंतु, त्यांच्या सहा महिन्यांच्या प्रशिक्षण कालावधीत निम्म्याहून अधिक विद्यार्थ्यांना नाकारण्यात येते, त्यावरून पदवी कोर्स दरम्यान विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक असणारे कौशल्य विकसित केले जात नाही.

मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशात सुमारे ६ हजार २१४ इंजिनियरिंग आणि टेकनॉलॉजीचे कॉलेज आहेत. त्यात सुमारे २९ लाख विद्यार्थी प्रवेश घेतात त्यापैकी १० लाख ५० हजार विद्यार्थी इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त करतात मात्र यात ९० टक्के इंजिनियर हे फक्त नावापुरतेच असून फक्त १० टक्के इंजिनियरच रोजगारक्षम आहेत. या परिस्थितीसाठी योग्य त्यावेळी पालकांकडून योग्य समुपदेशन न होणे हे ही एक कारण मानल्या जाते.