नागपूर मेट्रो भरतीमध्ये आरक्षण घोटाळा; युवक काँग्रेसचा मेट्रो भवनला घेराव

नागपूर मेट्रोमध्ये (Nagpur Metro) आरक्षणाला बगल देत खुल्या प्रवर्गातून अधिक उमदेवारांची निवड करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत पवार (NCP leader Prashant Pawar) यांनी केला होता. पवार यांच्या आरोपानंतर विविध सामाजिक संघटना (social organizations) आक्रमक झाल्या आहेत.

  नागपूर (Nagpur) : नागपूर मेट्रोमध्ये (Nagpur Metro) आरक्षणाला बगल देत खुल्या प्रवर्गातून अधिक उमदेवारांची निवड करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत पवार (NCP leader Prashant Pawar) यांनी केला होता. पवार यांच्या आरोपानंतर विविध सामाजिक संघटना (social organizations) आक्रमक झाल्या आहेत. नागपूर मेट्रोत पदभरती करताना आरक्षण डावलले, आणि बहुजन समाजावर अन्याय केला, असा आरोप करत आज महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीनं नागपूर मेट्रो भवनला (Nagpur Metro Bhavan) घेराव घालण्यात आला.

  प्रदेश युवक काँग्रेसच्या महासचिव शिवानी वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात, युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मेट्रो विरोधात जोरदार घोषणाबाजी केलीय. काँग्रेस कार्यकर्ते मेट्रो भवनच्या आत शिरण्याचा प्रयत्न करत असल्याने, काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. यावेळी “आरक्षण डावलून पदभरती, नोकरभरतीत मोठा घोटाळा केल्याचा आरोप करत, मेट्रोचे एमडी ब्रिजेश दीक्षीत यांनी खुल्या वर्गाच्या जास्त जागा भरल्या’ असा आरोप शिवानी वडेट्टीवार यांनी केलाय. बिंदू नामावली जाहीर केली नाही, तर पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी शिवानी वडेट्टीवार यांनी दिलाय.

  नागूपर मेट्रोवर आरक्षणाला डावलल्याचा आरोप का?
  नागपूर मेट्रोने आरक्षण धोरणाला बगल देऊन खुल्या प्रवर्गाला 357 जागा असताना प्रत्यक्षात मात्र तब्बल 650 जागा भरण्यात आल्या. तर 2015 ते 2021 या काळातील पदभरतीत ओबीसी, एससी आणि एनटी समाजावर मोठा अन्याय करण्यात आला, असा आरोप प्रशांत पवार यांनी केला होता. एससी प्रवर्गाच्या 132 जागा असताना केवळ 42 उमेदवारांना सेवेत घेण्यात आले आहे. तर एसटी प्रवर्गाच्या 66 जागा असताना फक्त 24 जणांना सेवेवर घेतलंय. ओबीसी समाजाच्या 238 जागा असताना फक्त 113 जणांना नोकरी देण्यात आली आहे, असं प्रशांत पवार यांनी आपल्या आरोपात म्हटलं आहे. तसेच या महामेट्रोच्या महापदभरती घोटाळ्याची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केलीय.

  नागपूर मेट्रोमधील प्रवर्गनिहाय पदसंख्या आणि भरलेली पदे
  एससी जागा – 132 ( घेतले 42)
  एसटी जागा – 66 ( घेतले 24 )
  ओबीसी जागा – 238 ( घेतले 113 )
  इडब्लूएस जागा – 88 ( घेतले 12)
  खुला प्रवर्ग जागा – 357 ( घेतले -650)

  शिवसेना खासदार कृपाल तुमाने मुख्यमंत्र्यांना भेटणार
  महामेट्रोत आरक्षण डावलून पदभरती घोटाळा झाल्याचा आरोप करत रामटेकचे शिवसेना खासदार कृपाल तुमाने आक्रमक झाले आहेत. खासदार तुमाने थेट मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करणार आहेत. तसंच या प्रश्नी ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देखील भेट घेणार आहेत. शिवसेना खा. कृपाल तुमाने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंकडे याच प्रकरणाची तक्रार करणार आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या आरक्षणाला मेट्रोकडून तिलांजली दिली गेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून चौकशीची करणार मागणी असल्याचं खासदार तुमाने यांनी सांगितलं आहे.