संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

भाजपाच्या केंद्रीय कार्यकारिणीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा समावेश होण्याची देखील शक्यता वर्तवली जात होती. देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली वाऱ्यांमुळे या चर्चेला अधिकच खतपाणी घातलं जात होतं.

    नागपूर, पुढील वर्षी देशभरात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका (Assembly elections) होणार आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षाने देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्यावर महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली आहे. येत्या वर्षभरात देशात उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा (Goa) आणि मणिपूर या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. यामध्ये गोव्याच्या निवडणुकीची (Goa Election) जबादारी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे सोपविली आहे.

    गेल्या काही महिन्यांपासून फडणवीस यांना केंद्रात वेगळी जबाबदारी दिली जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. भाजपाच्या केंद्रीय कार्यकारिणीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा समावेश होण्याची देखील शक्यता वर्तवली जात होती. देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली वाऱ्यांमुळे या चर्चेला अधिकच खतपाणी घातलं जात होतं. त्यामुळे फडणवीस आता देशाच्या राजकारणात सक्रीय होतील, असं देखील बोललं गेलं. मात्र, या सर्व चर्चाच ठरल्याचं स्पष्ट झाल्यानंतर आता भाजपानं देवेंद्र फडणवीसांकडे नवी जबाबदारी सोपवली आहे.