नागपूर कारागृहात कुख्यात गुंड संतोष आंबेकर याला कोरोनाची लागण

  • नागपूरमधील मध्यवर्ती कारागृहात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. आतापर्यंत २१९ केद्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. तसेच कारागृहातील कर्मचारी, अधिकारी तसेच स्टाफला देखील कोरोनाची बाधा झाली आहे. नागपुरात कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. शुक्रवारी कोरोनामुळे ५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यमुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ४५ वर पोहोचली आहे. तर एकूण आकडा २७७४ वर पोहचला आहे. २४ तासात १२५ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.

नागपूर – नागपूरमध्ये कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. संपूर्ण जिल्ह्यासह शहराला कोरोनाचा विळखा बसत आहे. नागपूर मध्यवर्ती कारागृहात असलेला कुख्यात गुंड संतोष आंबेकर याला कोरोनाची बाधा झाली आहे. संतोष आंबेकर याला कोरोना झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्या कारागृतील रुग्णालयात उपाचर देण्यात आले. परंतु आता नागपूरमधील मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले आले. मेयो रुग्णालयाच्या बाहेर तसेच परिसरात पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे. 

नागपूरमधील मध्यवर्ती कारागृहात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. आतापर्यंत २१९ केद्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. तसेच कारागृहातील कर्मचारी, अधिकारी तसेच स्टाफला देखील कोरोनाची बाधा झाली आहे. नागपुरात कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. शुक्रवारी कोरोनामुळे ५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यमुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ४५ वर पोहोचली आहे. तर एकूण आकडा २७७४ वर पोहचला आहे. २४ तासात १२५ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.