सुरक्षारक्षक महिलेकडे शरीरसुखाची मागणी; मेयो रुग्णालयात खळबळ

पाटीलच्या वर्तणुकीमुळे मेयोत तैनात अन्य महिला जवानही त्रस्त असल्याचे पुढे आले. पीडित महिलेने जानेवारीतही पाटीलविरुद्ध वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत पाटीलची बदली करण्यात आली.

    नागपूर (Nagpur) : राजू विठ्ठल पाटील (वय ४५) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पर्यवेक्षकाचे नाव आहे. या घटनेने मेयो व दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही २८ वर्षीय महिला मेयोत सुरक्षारक्षक (security guard) पदावर कार्यरत आहे. तिला सुटी देण्यासाठी पाटील हा शरीरसुखाची मागणी करायचा. तिला त्रास द्यायचा.

    आरोपीने ५ सप्टेंबरलाही महिलेची छेड काढली. महिलेने कुटुंबीयांना याबाबत सांगितले. त्यानंतर तिने तहसील पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी महिलेसह अन्य महिला जवानांची चौकशी केली. त्यानंतर विनयभंग व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणात पोलिसांनी अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल केला. पोलिसांनी राजू पाटीलला अटक केली.

    पाटीलच्या वर्तणुकीमुळे मेयोत तैनात अन्य महिला जवानही त्रस्त असल्याचे पुढे आले. पीडित महिलेने जानेवारीतही पाटीलविरुद्ध वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत पाटीलची बदली करण्यात आली. परंतु, त्याला कार्यमुक्त करण्यात आले नव्हते. महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल होऊ नये, यासाठी मेयोतील एका डॉक्टरनेही प्रयत्न केल्याची माहिती आहे.