She murdered her husband by tying him to a chair by showing him a porn video Shocking incident in Nagpur

हत्या करणारी महिला ही मृत व्यक्तीची पाचवी पत्नी आहे. ८ मार्च रोजी ही महिला आपल्या पतीला भेटण्यासाठी गेली होती. यावेळी तीने आधी पतीला सोशल मिडीयावर पॉर्न व्हिडीओ दाखवले. यानंतर त्याचे हात पाय खुर्चीला बांधले. तो बेसावध होताच तिने सोबत आणलेला सुरा काढला आणि नवऱ्यावर सपासप वार करुन त्याची हत्या केली.

    नागपूर : पॉर्न व्हिडीओ दाखवून एका महिलेने आपल्या पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे. या महिलेला पोलिसांनी अटक केली.

    हत्या करणारी महिला ही मृत व्यक्तीची पाचवी पत्नी आहे. ८ मार्च रोजी ही महिला आपल्या पतीला भेटण्यासाठी गेली होती. यावेळी तीने आधी पतीला सोशल मिडीयावर पॉर्न व्हिडीओ दाखवले. यानंतर त्याचे हात पाय खुर्चीला बांधले. तो बेसावध होताच तिने सोबत आणलेला सुरा काढला आणि नवऱ्यावर सपासप वार करुन त्याची हत्या केली.

    पतीची हत्या केल्यानंतर महिलेने घटनास्थळावरुन धूम ठोकली. हा प्रकार पोलिसांना समजताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. यावेळी तिने हत्येची कबूली दिली.

    मृत व्यक्तीची चार लग्न झाली असून ही त्याची पत्नी आहे. या दोघांमध्ये पैशावरुन वाद होत होते. यातूनच या महिलेने पतीची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.