बाळासाहेब ठाकरेंचं स्मृतीस्थळ शुद्ध करणारे बुरसटलेल्या तालिबानी विचारांचे; देवेंद्र फडणवीस यांचा शिवसेनवर हल्लाबोल प्रतिक्रिया!

 ज्या लोकांनी हे केले त्या लोकांना बाळासाहेबांची शिवसेना समजलेली नाही. ही अतिशय संकुचित मानसिकता आहे. मी तर म्हणेन एकप्रकारे बुरसटलेली तालिबानी मानसिकता आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारी ही शिवसैनिकांची कृती नाही, अशी टीका फडणवीसांनी केली.

    नागपूर : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण करणाऱ्या शिवसैनिकांची कृती म्हणजे बुरसटलेली तालिबानी मानसिकता आहे, अशी टीका केली. ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.

    ज्या लोकांनी हे केले त्या लोकांना बाळासाहेबांची शिवसेना समजलेली नाही. ही अतिशय संकुचित मानसिकता आहे. मी तर म्हणेन एकप्रकारे बुरसटलेली तालिबानी मानसिकता आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारी ही शिवसैनिकांची कृती नाही, अशी टीका फडणवीसांनी केली.

    काल आम्ही सवाल विचारला की, ज्यांनी बाळासाहेबांना कैदेत टाकण्याचा प्रयत्न केला त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात आणि बाळासाहेबांवर श्रद्धा ठेवून बाळासाहेबांच्या समाधीवर जर कुणी जात असेल तर ती समाधी अपवित्र झाली असे सांगतात हे कितपत योग्य आहे? मला असे वाटते की ही कृती अतिशय अयोग्य आहे, असे फडणवीस म्हणाले.