नारायण राणेंच्या वक्तव्यामुळे शिवसेनेचा नागपुरी संताप अनावर? ‘भाजयुमो’कडूनही घोषणाबाजी

नागपुरात काही ठिकाणी राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहनसुद्धा करण्यात आले. धंतोली येथील भाजपच्या विभागीय कार्यालयापुढेही शिवसैनिकांनी जोरदार आंदोलन (Agitation) केले.

  नागपूर (Nagpur) : केंद्रीय मंत्री (Union Minister) नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्याविरुद्ध केलेल्या विवादित वक्तव्याचे पदसाद संपूर्ण राज्यभर उमटत आहेत. दरम्यान नागपुरात शिवसैनिकांनी (Shiv Sainik) महाल भागातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याजवळ एकत्रित येऊन मंत्री राणेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.


  नागपुरात काही ठिकाणी राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहनसुद्धा करण्यात आले. धंतोली येथील भाजपच्या विभागीय कार्यालयापुढेही शिवसैनिकांनी जोरदार आंदोलन (Agitation) केले.

  पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
  नागपुरातील धंतोली येथील भाजपच्या विभागीय कार्यालयासमोर लागला पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांच्यावतीनं बंदोबस्त ठेवण्यात आला होता.राज्यात घडत असलेल्या घटना बघता पोलिसांनी तयारी करत बंदोबस्त ठेवला होता.

  शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी
  नागपूरमध्ये शिवसैनिंकानी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शिवसैनिक कोंबड्या हातात घेऊन आंदोलनात सहभागी झाले होते..

  भाजपयुमोकडून घोषणाबाजी
  भाजपच्या नागपूर विभागीय कार्यालयासमोर भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ता जमा झाले होते. युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी भारत माता की जयच्या घोषणा दिल्या आहेत. भाजपच्या कार्यालयासमोर कोणी शिव सैनिक येऊ नये यासाठी भाजपचे कार्यकर्ते जमा झाले होते. भाजयुमोकडून शिवसैनिकांविरोधात जोरदार घोषणा बाजी करण्यात आली.