मामा बनला शकुनी मामा; दगडाने ठेचून केली भाच्याची हत्या

मामाने भाच्याची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना (uncle stoned his niece to death.) वाडी पोलीस स्टेशनच्या (Wadi police station) हद्दीत घडली आहे. शहराच्या सीमेवर वाडी परिसरातील पीक्स कंपनीमागे मैदानावर ही घटना घडली. अतुल लष्कर (Atul Lashkar) असे हत्या झालेल्याचे नाव आहे.

    नागपूर (Nagpur). मामाने भाच्याची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना (uncle stoned his niece to death.) वाडी पोलीस स्टेशनच्या (Wadi police station) हद्दीत घडली आहे. शहराच्या सीमेवर वाडी परिसरातील पीक्स कंपनीमागे मैदानावर ही घटना घडली. अतुल लष्कर (Atul Lashkar) असे हत्या झालेल्याचे नाव आहे. कौटुंबिक वादातून ही हत्या झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले (Police have arrested both) आहे. त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. यातील एकजण अल्पवयीन आहे.

    अतुल दोन दिवसांपासून बेपत्ता होता. त्याचा शोध सुरु असताना एक मृतदेह रक्ताने माखलेल्या अवस्थेत गुरुवारी सकाळी वाडीतील पीक्स कंपनीमागील मैदानात आढळून आला. त्याच्या डोक्यावर वार केलेल होते. कपड्यांवरुन तो अतुल लष्कर असल्याचे पुढे आले. अतुल एक कॅन्टीनमध्ये कामाला होता. त्याच्यावरही मारहाणीचे गुन्हे दाखल आहे.

    अतुलची आई आणि बहीण काही वर्षांपूर्वी बेपत्ता झाली होती.त्याबबात अतुल नेहमी मामाला विचारणा करायचा. त्यावरुन अतुलचा मामासोबत अनेकदा वाद होत होता. दोघांमध्ये खटकेही उडायचे. या कारणावरुन काही दिवसांपूर्वी अतुलने मामाला मारहाणही केली होती. बुधवारी आरोपी मामा आणि अल्पवीयने संशयीत आरोपीने अतुलला पिक्स कंपनीच्या पाठीमागे बोलवले. तिथेच अतुल आणि आरोपींचा जोरदार वाद झाला होता. तिथेच मामाने भाच्याची हत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

    मामा आणि भाचाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्यांदृष्टीने तपास सुरु केला. अतुलचा मामा संदीप सायकाळ यांने अतुलने केलेल्या मारहाणीचा राग खदखद होता. त्याच रागातून मामाने अतुलची हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले. बुधवारी त्यांने अतुलची दगडाने ठेचून हत्या केली. या हत्येप्रकरणी अतुलच्या वडिलांना मामावरच संशय व्यक्त केला होता. याआधी धमकवल्याची तक्रार पोलिसात करणण्यात आली होती. त्यामुळं वाडी पोलिसांनी चौकशीनंतर आरोपी मामासह एका अल्पवयीने आरोपीविरुद्ध खूनचा गुन्हा दाखल केला. घटना उघडकीस आल्यानंतर तीन तासात पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले.