प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन (covachield and covacin) लसीचा दुसरा डोज (second dose of Vaccination) घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिक (Senior citizens) उत्सुकता वाढत आहे. आरोग्य विभागाकडे (the health department) दुसऱ्या डोजचा पुरेसा साठाच उपलब्ध नसल्याने ज्येष्ठांना मनस्ताप सहन करावा लागतोय.

  नागपूर (Nagpur). कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन (covachield and covacin) लसीचा दुसरा डोज (second dose of Vaccination) घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिक (Senior citizens) उत्सुकता वाढत आहे. आरोग्य विभागाकडे (the health department) दुसऱ्या डोजचा पुरेसा साठाच उपलब्ध नसल्याने ज्येष्ठांना मनस्ताप सहन करावा लागतोय. लसिकरणासाठी केंद्रावर पोहोचलेल्या ज्येष्ठांना ‘आज लसिकरण बंद’ (vaccination is closed today) असल्याचा फलक दाखविला जातोय्. परिणामी, ज्येष्ठांना नाहक मनस्ताप सहन करत घराकडे परत फिरावे लागत आहे.


  लसीसाठी जेष्ठ नागरिकांची भटकंती 
  69 वर्षांचे किशोर नेवारे सात ते आठ किमी सायकलवरुन लसीकरण केंद्रावर येतात. पण ‘आज लसीकरण बंद’ हा बोर्ड वाचून त्यांना परत जावं लागतंय, या वयात ते चार वेळा लसीकरण केंद्रांवर आलेय. पण लस नसल्यामुळे त्यांना कोव्हिशिल्ड लसीचा दुसरा डोस मिळाला नाही.

  लसीकरणासाठी इकडून तिकडे भटकंती करणारे किशोर नेवारे एकटेच नाहीत, तर लसीकरणाच्या या खेळखंडोब्यात अनेक ज्येष्ठ नागरिकांचे हाल सुरु आहे… त्यामुळे लसीचा तुटवडा आहे हे मान्य असलं, तरिही योग्य नियोजन करुण ज्येष्ठ नागरीकांचं लसीकरण करावं, अशी सामान्य अपेक्षा नागपूरमधले सगळेच नागरिक करु लागले आहेत.

  ज्येष्ठांना मनस्ताप
  शहरात असे खूप ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्यांनी लसीचा पहिला डोस घेतलाय जे दुसऱ्या डोसच्या प्रतिक्षेत आहेत. कोरोना प्रतिबंधक लसीच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे आणि महापालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे ज्येष्ठांना दोन चार किलोमीटर पायपीट करुनही लस मिळत नसल्याने जेष्ठांना मनस्ताप सहन करावा लागतोय.

  लसीचा अपुरा पुरवठा
  राज्यात कोरोना लसीकरणाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. तर दुसरीकडे कोरोना लसीकरण मोहिमेनेही चांगलाच वेग धरला आहे. कोरोनापासून बचावासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय आहे. परंतु लसीच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे लसीकरणात अडथळा निर्माण होऊन खंड पडतो आहे.