विदर्भातील उद्योगांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत; ४०० हून अधिक उद्योगांना मिळणार गती

कोरोना (coronavirus) रुग्णांची संख्या कमी झाल्याने राज्य सरकारने लघू, मध्यम व सूक्ष्म उद्योगांचा ऑक्सिजन पुरवठा (oxygen supply to industries) पुन्हा सुरू केला आहे. त्यामुळे विदर्भातील ४०० पेक्षा अधिक उद्योगांची चाके पुन्हा फिरू लागली आहे.

    नागपूर (Nagpur).  कोरोना (coronavirus) रुग्णांची संख्या कमी झाल्याने राज्य सरकारने लघू, मध्यम व सूक्ष्म उद्योगांचा ऑक्सिजन पुरवठा (oxygen supply to industries) पुन्हा सुरू केला आहे. त्यामुळे विदर्भातील ४०० पेक्षा अधिक उद्योगांची चाके पुन्हा फिरू लागली आहे. हॉस्पिटलकडून मागणीच नसल्याने उद्योगांना हवा तेवढा ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. लहान मोठ्या एकूण दोन हजारावर उद्योजकांमध्ये असलेल्या कामगारांच्या हातांना पुन्हा काम मिळू लागले आहे. (oxygen supply to 400 industries in vidarbha)

    ऑक्सिजनची सर्वाधिक आवश्यकता फॅब्रिकेशन इंडस्ट्रीजमध्ये असते. धातू कापण्यासाठी ऑक्सिजन सिलिंडरची गरज असते. अनेक कास्टिंग कंपन्यांमध्येही मोठ्या भट्ट्या असतात. त्या धगधगत्या ठेवण्यासाठीही ऑक्सिजन लागतो. तसेच लेझर कटिंगद्वारे स्टिलसह विविध धातूची उत्पादने कापण्यासाठीही मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनची गरज असते. जिल्ह्यातील बुटीबोरी, हिंगणा, कळमेश्वर येते पाच तर चंद्रपूर, वर्धा आणि अमरावती सर्व मिळून दहा ते अकरा ऑक्सिजन प्लान्ट आहे. या सर्वच प्लान्टमधून उद्योगांना ऑक्सिजनचा पुरवठा आता सुरळीत सुरू झालेला आहे.

    कोरोनाचे रुग्ण वाढल्याने सात एप्रिलला राज्य सरकारने उद्योगांचा १०० टक्के ऑक्सिजन पुरवठा थांबवून, तो रुग्ण हॉस्पिटलसाठी राखीव ठेवला होता. कोरोना प्रादुर्भाव वाढल्यानंतर ऑक्सिजन प्लॅन्टमधून १४ हजार पेक्षा अधिक सिलिंडरचा वापर होत होता. आता फक्त १५०० ही सिलिंडरची मागणी रुग्णालयातून नाही. ऑक्सिजन प्लान्टचा उरलेला अतिरिक्त ऑक्सिजनही उद्योगांना दिला जावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. मात्र, राज्य सरकारने अद्यापही ऑक्सिजनच्या पुरवठ्यावर निर्बंध आणले आहे.

    त्यात २० टक्के उद्योगांसाठी ऑक्सिजन तर ८० टक्के हॉस्पिटलसाठी राखीव ठेवावा लागतो आहे. कंपन्यांनापुढे आता उत्पादित केलेल्या ऑक्सिजनचे करायचे काय असा प्रश्न उभा ठाकला आहे. कोरोनाचे रुग्ण वाढले असताना एप्रिल आणि मे महिन्यात ऑक्सिजन मिळणे कठीण झाले होते हे विशेष.