Special issue of 'Navrashtra' on the occasion of Union Minister Nitin Gadkari's birthday; The Chief Minister, Deputy Chief Minister, Supriya Sule and Congress leaders also showered appreciation

राजकारणातील आणि सर्जनातील संवेदनशील नेतृत्व आणि अजातशत्रू असा नावलौकिक असणारे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांचा गुरुवारी वाढदिवस आहे. नितीनजींच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देणारा आणि त्यांच्या कार्याचं कौतुक करणारा विशेषांक ‘नवराष्ट्र’ प्रकाशित करीत आहे.

    नागपूर : राजकारणातील आणि सर्जनातील संवेदनशील नेतृत्व आणि अजातशत्रू असा नावलौकिक असणारे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांचा गुरुवारी वाढदिवस आहे. नितीनजींच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देणारा आणि त्यांच्या कार्याचं कौतुक करणारा विशेषांक ‘नवराष्ट्र’ प्रकाशित करीत आहे.

    या विशेषांकात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे केंद्रीय पातळीवरचे नेते प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील, सा. बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, शिवसेनेचे नेते आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या शब्दात नितीनजींच्या कार्याचा आणि एकूण राजकीय प्रवासाचा आढावा घेतला आहे.

    राजकारणी नव्हे टास्क मास्टर, मोकळा ढाकळा नेता, महाराष्ट्राच्या कीर्तीचा सुगंध देशात पसरवणारा नेता, महामार्गांचा विकासपुरुष, निर्भिड, खंबीर आणि दिलखुलास, विकासपिसासू नेता या आणि अशा अनेक शिर्षकांनी या बहुपक्षीय मान्यवरांनी नितीन गडकरींच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले आहे, त्याचबरोबर त्यांच्या आजवरच्या कामाचं कौतुकही केलेलं आहे.

    हे सगळे लेख वाचण्यासाठी गुरुवारचा ‘नवराष्ट्र’चा अंक वाचायला नक्की विसरु नका. हे सर्व लेख तुम्हाला www.navarashtra.com या वृत्तपत्राच्या वेबसाईटवरही नक्की वाचायला मिळतील.