‘पीओपी’ मूर्तींच्या खरेदी-विक्रीवर राज्य शासनाची बंदी; उलंघन करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई

महापौर दयाशंकर तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी महापौरांनी या नियमांची कठोर अंमलबजावणीसंदर्भात काही सूचना प्रशासनाला दिल्या. महापौर म्हणाले, 'पीओपी मूर्तीसंदर्भातील बंदीचे आदेश असल्याने त्याची कडक अंमलबजावणी आवश्यक आहे.

    नागपूर (Nagpur) : प्लास्टर ऑफ पॅरिस (plaster of Paris idols) गणेशमूर्तींच्या (Ganesh idols) खरेदी-विक्रीवर (sale and purchase) राज्य सरकारने (The state government) बंदी घातली आणली. त्यामुळे या काळात महापालिका क्षेत्रात (the municipal area) नियमांचे उल्लंघन (violating the rules) करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशा सूचना (instructions) नागपूर महापालिका प्रशासनाला (the Nagpur Municipal Administration) देण्यात आल्या आहेत.

    यासंदर्भात महापौर दयाशंकर तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी महापौरांनी या नियमांची कठोर अंमलबजावणीसंदर्भात काही सूचना प्रशासनाला दिल्या. महापौर म्हणाले, ‘पीओपी मूर्तीसंदर्भातील बंदीचे आदेश असल्याने त्याची कडक अंमलबजावणी आवश्यक आहे. प्रत्येक मूर्तिकारासाठी नोंदणी बंधनकारक केली आहे. त्यांना मूर्तीविक्रीसाठी झोननिहाय जागा उपलब्ध करून देण्याची कार्यवाहीसुद्धा तातडीने सुरू करण्यात यावी. पीओपी मूर्तीसंदर्भात झोनस्तरावर जनजागृतीचा कार्यक्रम आखण्यात यावा.

    ‘ही’ होणार कारवाई (This will be the action on selling POP idols)
    पीओपी मूर्तीची खरेदी अथवा विक्री केल्यास दहा हजारांचा दंड, दुकाने सील, डिपॉझिट जप्त, दोन वर्षे बंदी याशिवाय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण कायद्यान्वये फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. ही माहिती प्रत्येक नागरिकापर्यंत पोहचणे आवश्यक आहे. यासाठी स्वयंसेवी संस्थांचीही मदत घ्या, कचरागाड्या, चौकातील ध्वनिक्षेपक आदी ठिकाणांहून यासंदर्भात माहिती देणाऱ्या ऑडियो क्लिप प्रसारित करा. कायद्याच्या अंमलबजावणीसाठी टास्क फोर्स तयार करा. माती मूर्ती तयार करणाऱ्या, पर्यावरणक्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तीचाही यात समावेश असावा. विसर्जन करताना पीओपी मूर्ती आढळली तर भक्तांवरही कारवाई करण्यात येईल.

    पीओपी मूर्ती बंदीसंदर्भात अंमलबजावणीसाठी प्रशासनाने केलेल्या तयारीची माहिती उपायुक्त राजेश भगत, विजय देशमुख तसेच नोडल अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांनी दिली. बैठकीला सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, आरोग्य समितीचे सभापती महेश महाजन, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल आदी पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.