तान्हा पोळा यंदाही भरणार नाही; बाळ-गोपाळांच्या आनंदावर विरजण

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात मोठा पोळा व तान्हा पोळा सार्वजनिकरित्या साजरा करण्यास प्रतिबंध घालण्यात आले आहे. हे दोन्ही सण सार्वजनिकरीत्या साजरे झाल्यास कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

    नागपूर (Nagpur) : कोरोनाच्या तिस-या लाटेचा (The third wave of corona) धोका (The threat) अजून संपलेला नाही. त्यामुळे त्याबाबतचा धोका लक्षात घेऊन नागपूर जिल्ह्यात यंदा मोठा आणि तान्हा पोळा भरणार नसल्याचे आदेश जिल्हाधिकारी विमला आर. (Collector Vimala R.) यांनी जारी केले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पध्दतीने सण साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

    पोळा सणाला ग्रामीण भागात विशेष महत्त्व असते. यानिमित्ताने ठिकाणी यात्रा मेळाव्याचे देखील आयोजन होते कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात मोठा पोळा व तान्हा पोळा सार्वजनिकरित्या साजरा करण्यास प्रतिबंध घालण्यात आले आहे. हे दोन्ही सण सार्वजनिकरीत्या साजरे झाल्यास कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यामुळे प्रशासनाने मोठा पोळा व तान्हा पोळा सार्वजनिकरीत्या साजरा करण्यास प्रतिबंध घातला आहे.

    हा सण घरीच साजरा करावा बैलांच्या मिरवणूका काढण्यात येऊ नये. आरती, पुजा व अन्य धार्मिक कार्यक्रमात गर्दी होणार नाही. तसेच ध्वनीप्रदुषनाच्या नियमांचे पालन करावे. बैलांची पुजा करतांना शारीरिक अंतर पाळणे, तोंडाला मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करावा तसेच कोरोना विषाणु प्रादुर्भावासाठी शासनाने केलेल्या वेळोवेळी मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. याशिवाय तान्हा पोळाही साधा पद्धतीन साजरा करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी विमला आर. केलं आहे.

    तान्हा पोळ्याची ऐतिहासिक परंपरा (Historical tradition of Tanha Pola)
    नागपुरातील तान्हा पोळ्या बच्चे कंपनीचा आकर्षण असते. नवीन पिढीमध्ये कृषिसंस्कृती याउद्देशाने भोसले घराण्याने तान्हा पोळ्याची २०० पेक्षा जास्त वर्षांपूर्वी सुरुवात केली होती. लाकडी नंदीची सजावट करून मिरवणूक काढण्यात येते. बच्चे कंपनीकरिता त्यामुळं तान्हा पोळ्याचं विशेष उत्साह असतो. मात्र यंदाही कोरोनाच्या धास्तीने तान्हा पोळा भरवण्यासही परवानगी नाही. शिवाय नागपूरची आगळी-वेगळी परंपरा असलेली मारबत मिरवणूकही सलग दुस-या वर्षी कोरोनामुळं निघणार नाही.