तरुण भारतचे माजी मुख्य संपादक मा. गो. वैद्य यांचे निधन

तरुण भारतचे (tarun bharat) माजी मुख्य संपादक आणि रा. स्व. संघाचे माजी बौद्धिक व प्रचार प्रमुख माधव गोविंद उपाख्य बाबुराव वैद्य (mg vaidhya) यांचे आज दुपारी ३.३० वाजता निधन झाले

नागपूर. तरुण भारतचे (tarun bharat) माजी मुख्य संपादक आणि रा. स्व. संघाचे माजी बौद्धिक व प्रचार प्रमुख माधव गोविंद उपाख्य बाबुराव वैद्य (mg vaidhya) यांचे आज दुपारी ३.३० वाजता निधन झाले (passes away). ते ९७ वर्षांचे होते.
गेल्या काही दिवसांपासून ते रुग्णालयात दाखल होते. मा. गो. वैद्य त्यांच्या प्रखर लिखाणासाठी प्रसिद्ध होते. वयाच्या ९७ व्या वर्षीसुद्धा त्यांची तल्लख बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्ती दाद देण्यासारखी होती.

त्यांच्या पश्चात पत्नी सुनंदा, तीन मुली- विभावरी गिरीश नाईक, डॉ. प्रतिभा उदय राजहंस, भारती जयंत कहू, तसेच पाच मुले- धनंजय, डॉ. मनमोहन (सह सरकार्यवाह, रा. स्व. संघ), श्रीनिवास, शशिभूषण व डॉ. राम (हिंदू स्वयंसेवक संघ, सह संयोजक) व बराच मोठा आप्त परिवार आहे.