संचारबंदीत चहाविक्रीच्या हातगाड्या, हाॅटेल्स बंद; चहापत्ती विक्रीत ६० टक्क्यांनी घट

संचारबंदीमुळे चहापत्ती व्यवसायाचे (the tea business) मोठे नुकसान झाले आहे. यामुळे चहापत्तीची विक्री अवघी ६० टक्क्यांवर आली आहे. चहाचे ठेले आणि हाॅटेल्स (Tea carts and hotels) व्यवसाय रोजगाराचे मोठे माध्यम आहे. प्रशासनाने संचारबंदीत (the curfew) किमान चहाविक्री करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांकडून केली जात आहे.

  नागपूर (Nagpur).  संचारबंदीमुळे चहापत्ती व्यवसायाचे (the tea business) मोठे नुकसान झाले आहे. यामुळे चहापत्तीची विक्री अवघी ६० टक्क्यांवर आली आहे. चहाचे ठेले आणि हाॅटेल्स (Tea carts and hotels) व्यवसाय रोजगाराचे मोठे माध्यम आहे. प्रशासनाने संचारबंदीत (the curfew) किमान चहाविक्री करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांकडून केली जात आहे.

  शहरात करोनामुळे जाहीर झालेल्या टाळेबंदीमुळे चहाच्या व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. शहरात जवळपास ५० ते ६० मोठे चहाचे घाऊक व्यापारी असून दोनशेच्या जवळपास चहाचे किरकोळ व्यापारी आहेत. तर चहाचे ठेले व हॉटेल्सची संख्या हजारोंच्या घरात आहे. अशात टाळेबंदीमुळे हा व्यवसाय अनेक महिन्यांपासून बंद असल्याने चहाच्या व्यवसायाला मोठा फटका बसला आहे.

  महिन्याला सुमारे शंभर टन चहापत्ती आसाम, कोलकाता, गुहाटी, दक्षिण भारताच्या कुन्नुर, कोईमतूर, कोचिन आदी ठिकाणांवरून येते. भारतात सहा ठिकाणी नोंदणीकृत चहापत्तीचा लिलाव होतो. त्यानंतर माल विविध राज्यात वितरित करण्यात येतो. मात्र सध्या अनेक राज्यात टाळेबंदी असून यामुळे वाहतुकीमध्ये अडचणी येत असल्याने माल पंधरा दिवस विलंबाने पोहचत आहे.

  चहापत्ती आल्यावर त्याला विविध प्रकारची चव देऊन त्याचे कंपनीत पॅकेजिंग करून घाऊक विक्रेत्यांकडे येते. त्यानंतर मात्र तिचे वितरण शहरातील विविध किरकोळ दुकानांमध्ये केले जाते. सध्या चहाचे ठेले व हॉटेल-रेस्टॉरेंट बंद असल्याने केवळ चाळीस टन चहापत्ती शहरात येत आहे.

  त्याशिवाय खाजगी व शासकीय कार्यालयांमध्ये जाणारा चहा देखील बंद झाला आहे. त्याचाही मोठा परिणाम या व्यवसायावर झाला आहे. चहापत्तीची विक्री कमी झाल्याने व्यापाऱ्यांची घाऊक खरेदी देखील कमी झाली आहे. अशात चहाच्या व्यवसायिकांना महिन्याला कोटय़वधीचे नुकसान सहन करावे लागत आहे.

  घरगुती मागणीही कमी
  करोनामुळे हॉटेल-चहाचे ठेले बंद असल्याने चहापत्तीच्या विक्रीत घट नोंदवल्या गेली असतानाच आता घरगुती चहापत्तीची खरेदी देखील रोडावली आहे. करोनामुळे लोक दुसऱ्यांच्या घरी जाणे टाळत असून पाहुणे देखील येत नसल्याने महिन्याच्या किराण्यात येणाऱ्या चहापत्तीचे प्रमाण कमी झाला आहे. सरासरी एका परिवारात अर्धा ते एक किलो चहापत्तीची खरेदी एकदम २५० ग्रमवर अली आहे. त्यामुळे चहापत्तीच्या व्यवसायाला दुहेरी मार सहन करावा लागत आहे.

  टाळेबंदीमुळे चहापत्तीचा व्यवसाय ६० टक्के प्रभावित झाला आहे. सरकारने करोनाचे कठोर निर्बंध उठवून चहाचे ठेले अथवा हॉटेल सुरू करण्यास परवानगी द्यावी. हा व्यवसाय करणारे हातावर पोट असलेल्यांना दोन वेळेचे भोजन मिळणे कठीण झाले आहे. किमान दुपारी चार पर्यंत त्यांना व्यवसाय करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी चहा व्यापाऱ्यांनी केली आहे.