ताडोब्यात ‘त्या’ वाघिनीचा वाहनाच्या धडकेने मृत्यू; दोन महिन्यांपूर्वी झाला होता अपघात

वाहनाच्या धडकेत जखमी झालेली ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील (Tadoba-Andhari) वाघीण खली (female Tiger Khali) हिचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. नागपुरातील गोरेवाडा बचाव केंद्रात (Gorewada Rescue Center in Nagpur) तिला उपचारासाठी आणण्यात आले होते. मात्र, येथेच तिने अखेरचा श्वास घेतला.

    नागपूर (Nagpur). वाहनाच्या धडकेत जखमी झालेली ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील (Tadoba-Andhari) वाघीण खली (female Tiger Khali) हिचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. नागपुरातील गोरेवाडा बचाव केंद्रात (Gorewada Rescue Center in Nagpur) तिला उपचारासाठी आणण्यात आले होते. मात्र, येथेच तिने अखेरचा श्वास घेतला. ताडोबा बफर झोनमध्ये (In the Tadoba buffer zone) 8 मे रोजी मोहर्ली आगझरी वनपरिक्षेत्रात (the Moharli Agzari Forest Reserve) तो वनकर्मचा-यांना जखमी अवस्थेत दिसला. त्यानंतर नागपुरात गोरेवाडा बचाव केंद्रात त्याच्यावर उपचार सुरु होते. ताडोबात येणा-या पर्यटकांसाठी खली वाघीण आकर्षणाचे केंद्र होता.

    अत्यंत रुबाबदार असलेला खली वाघाचा आगझऱी वनपरिक्षेत्रात वावर होता. धष्टपुष्ट आणि भारदस्त शरिर आणि आकर्षक रुप यांमुळं टी-50 नावाच्या या वाघाला खली नावानं ओळखलं जात होतं. आगरझरी वनपरिक्षेत्रात त्याचा चांगलाच दरारा होता. त्यामुळं हा रुबाबदार वाघ पर्यंटकांचंही आकर्षण होता. 8 मे रोजी ताडोबा बफर झोमधील आगझरी येथे वनकर्मचा-यांना तो जखमी अवस्थेत आढळून आला. त्याला दोन्ही पायान चालता येत नसल्यानं तसेच तब्येतीत सुधारणा होत नसल्यानं 10 मेला गोरेवाडा बचाव केंद्रात पुढील उपचाराकरता आणण्यात आलं.

    गेल्या दोन महिन्यापासून त्याच्यावर उपचार सुरु होते. मात्र त्याच्या प्रकृतीत काहीच सुधारणा आढळून आली नाही. त्याच्या पाठिचा कण्याला जबर मार लागलेला होता. त्यामुळं पशुवैद्यकिय पथक त्याच्यावर उपचार देत होते. मात्र खलीला उठताही येत नव्हते.अखेर उपचारादरम्यान सोमवारी त्याचा मृत्यू झाला. खली साधारण 10 वर्षांचा होता.

    दोन महिन्यापूर्वी त्याला एखाद्या वाहनाची धडक लागल्यानं त्याचा मणक्याला दुखापत झाली होती. त्याच्यातून तो सावरूच शकला नाही आणि दोन महिन्यांच्या उपचारात संघर्षानंतर त्याचा मृत्यू झाला. दरम्यान वनविभागाचे अधिकारी आणि पशुवैद्यकिय अधिकारी त्याची उत्तरिय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्याला अग्नी देण्यात आला.