प्रशासन आणि नागपुरकरांनी कोरोनाला हरविलेच; शंभरी ओलांडलेली मृत्यूची आकडेवारी फक्त ३ वर

कोरोनाचा वाढता आलेख (Corona's growing graph) रोखण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न (The administration efforts) आणि नागरिकांची दक्षता (citizens vigilance) मोलाची ठरली आहे. शहरात रविवारी 72 कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण (corona positive patients) आढळून आले.

    नागपूर (Nagpur). कोरोनाचा वाढता आलेख (Corona’s growing graph) रोखण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न (The administration efforts) आणि नागरिकांची दक्षता (citizens vigilance) मोलाची ठरली आहे. शहरात रविवारी 72 कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण (corona positive patients) आढळून आले. यामध्ये शहरातील 35, ग्रामीण भागातील 35 आणि जिल्ह्याबाहेरील 02 रुग्णांची नोंद करण्यात आली.

    शहरात एकेसमयी शंभरी ओलांडलेली मृतांची आकडेवारी अवघी 03 वर आली आहे. यामध्ये शहरातील 1, ग्रामीण भागातील शून्य आणि जिल्ह्याबाहेरील 02 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात रविवारी 9043 रुग्णांची कोरोना चाचणी घेण्यात आली. तर कोरोनामुक्त झालेल्या 195 रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. शहरात एकूण संक्रमित रुग्णसंख्या 4 लाख 76 हजार इतका आहे. तर कोरोना ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 1936 आहे. सध्यापर्यंत एकूण मृत्यूसंख्या 9004 इतकी आहे.