नागपूरच्या रेडलाईट परिसरात आढळले भुयार; पोलिसांनी टाकलेल्या धाडीत अनेक धक्कादायक खुलासे

गंगा जमून या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नागपूरच्या कुंटणखान्यात पोलिसांनी छापा टाकला या छाप्यात पोलिसांना एक भुयार आढळले आहे.

नागपूर. गंगा जमून या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नागपूरच्या कुंटणखान्यात पोलिसांनी छापा टाकला (ganga januna raid)या छाप्यात पोलिसांना एक भुयार आढळले आहे. अल्पवयीन मुलींना लपविण्यासाठी आणि पोलिसांचा छापा पडल्यास ग्राहकांना बाहेर काढण्यासाठी या भुयारीचा वापर करण्यात येत होता. धक्कादायक बाब म्हणजे अनेक अल्पवयीन मुलींकडून देहव्यापार करवण्यात येत असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी ८ अल्पवयीन मुलीची सुटका केली असून ११० दलालांना समवेत अनेक ग्राहकांना पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या अनेक वर्षात गंगा जमुनामध्ये केलेली सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात येत आहे. सलग दोन दिवस पोलिसांनी केलेल्या कारवाईत अनेक भुयार आणि गुप्त मार्ग पोलिसांना सापडले असल्याचे सूत्रांनी सांगितले.