प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

आपली लाडाची लेक चांगल्या घरी दिल्या जावी, तिला उत्तम जीवनसाथी मिळावा, असे प्रत्येक वधूच्या आई-वडिलास वाटते, त्यासाठी ते कर्ज काढूनही आपल्या मुलीच्या सुखी संसारात नंदनवन फूलवण्याचा प्रयत्न करतात. दरम्यान कोरोना काळामुळे वधू पित्यास मोठा दिलासा मिळाला असून, मोठा वायफळ होणारा खर्च कोरोनाच्या निर्बंधामुळे करावा लागत नाही, तर त्याचे हे लग्न कार्य अगदी कमी पैशात होत आहे.

  नागपूर ([Nagpur).  आपली लाडाची लेक चांगल्या घरी दिल्या जावी, तिला उत्तम जीवनसाथी मिळावा, असे प्रत्येक वधूच्या आई-वडिलास वाटते, त्यासाठी ते कर्ज काढूनही आपल्या मुलीच्या सुखी संसारात नंदनवन फूलवण्याचा प्रयत्न करतात. दरम्यान कोरोना काळामुळे वधू पित्यास मोठा दिलासा मिळाला असून, मोठा वायफळ होणारा खर्च कोरोनाच्या निर्बंधामुळे करावा लागत नाही, तर त्याचे हे लग्न कार्य अगदी कमी पैशात होत आहे.

  प्रत्येक कुटुंबात आपल्या मुलीला मोठ्या लाडात वाढवले जाते. पण हीच मुलगी उपवर झाल्यावर तिचे थाटामाटात लग्न करण्याची आपली संस्कृती समाजात आजही कायम टिकून आहे. उपवर होणाऱ्या मुलीचे वडील आर्थिक दृष्ट्या दुर्बल, गरीब असला तरी विविध मार्गाने कर्ज किंवा जमिनी गाहाण ठेवून आपल्या मुलीचा विवाह थाटामाटात करायचा हे आजपर्यंत कुणाला चुकले नाही. मग विवाहानंतर कर्जाच्या डोंगरात बुडून आत्महत्या करणारे वदू पिता समाजाला दिसूनही समाज आंधळा बनतो. ही खरोखरच खेदाची व चिंताजनक बाब आहे. जागतिक पातळीवर शिरकाव केलेल्या कोरोना महामारी ने वधू पित्याला आता मोठा दिलासा दिला आहे.

  विवाह म्हटला की, हजारो मंडळी आलीच त्यांच्या जेवणावळी, आहेर, साऊंड सिस्टीम, मंडप डेकोरेशन, बिछायत, मंगल कार्यालय, घोडा, महागडे पोषाख, दागिने या सगळ्या बाबी आल्याच, त्यातही होणार जावई कसा आहे काय करतो? ग्रामीण भागातील आहे की शहरी? यावर त्याचा रुबाब ठरला जातो. वधू पिताकडून वरा ला देण्यात येणारा हुंडा हा कायदेशीरपणे चुकीची बाब असली, तरी समाजात असे घडत नाही. शासनाने निर्बंध असेच ठेवले, तर मुलीचा घटत चाललेला जन्मभर वाढीस लागेल. मुलीच्या होणाऱ्या हत्या देखील थांबल्या जातील, असे असले तरी या आजच्या परिस्थितीत वधू पिता व त्याचे सर्व कुटुंब या निर्बंधावर समाधानी आहेत. आता याची कायद्यात अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा सर्वांची आहे.

  किमान विवाहासाठी कायदा करावा (At least legislation should be made for marriage)
  सध्या कोरोना काळात होत असलेले विवाह समाजाला वेगळीच दिशा देणारे ठरत आहे. कमी पैशात, शासनाकडून ठराविक मोजक्याच लोकांच्या साक्षीने विवाह करण्यास परवानगी दिल्याने सगळा थाटमाट, झगमगाट विरून गेला आहे. समाजातील अनेक मुलींनी आपल्या वडिलांच्या नाजूक, कमकुवत परिस्थितिचा विचार करत आत्महत्या केल्याच्या घटना नवीन नाहीत. मात्र, आपल्या वडिलांच्या शिरावर एकाही रुपयाचे कर्ज न होता हसत-हसत सासरी जाणाऱ्या नववधूचा आनंद वेगळाच असतो.

  कोरोनाच्या काळात शासनाने घालून दिलेल्या निर्बंधाच्या आधारावर किमान विवाहासाठी असा कायदा करण्यात यावा. त्यामुळे वदू पिताचा मोठ्या प्रमाणावर होणारा वायफळ खर्च टाळला जाणार आहे. शासनाने केलेले निर्बंध कायम करावेत व त्याची कायद्यात अंमलबजावणी करण्यात यावी. अशी अपेक्षा वधू पित्यांकडून केली जात आहे.