The couplings of the GT Express heading towards Nagpur suddenly broke; Leaving 3 coaches, the engine went ahead and ...

02616 नवी दिल्ली-चेन्नई सेंट्रल जीटी एक्स्प्रेस आपल्या नियोजित वेळेनुसार धावत होती. इटारसी-नागपूर सेक्शनदरम्यान पांढूर्णा रेल्वे स्थानक सोडल्यानंतर ही गाडी नागपूरच्या दिशेने येत होती. सकाळी 9.11 वाजताच्या सुमारास नरखेड-तिनखेडा दरम्यान दोन डब्यांना जोडणारे कपलिंग अचानक तुटले. मागचे तीन डबे मागेच ठेवून उर्वरित डबे घेऊन इंजिन पुढे निघाले. प्रेशर कमी झाल्याचे लोको पायलटच्या लक्षात आले. सोबतच मागच्या डब्यांची गती कमी झाल्याने गार्डच्याही लक्षात आले.

  नागपूर : नागपूरच्या दिशेने धडधडत येणाऱ्या जीटी एक्स्प्रेसचे कपलिंग अचानक तुटले. गाडीचे इंजिन मागचे 3 डबे सोडून पुढे निघाले. हे लक्षात येताच प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. मात्र सुदैवाने यावेळी गाडीची गती कमी असल्याने डबे रुळावरून घसरले नाही आणि मोठा अपघात टळला. ही घटना सोमवारी सकाळी नरखेड ते तिनखेडा दरम्यान खेडी खरीयात या गावाजवळ घडली. जवळपास 1 कि.मी. पर्यंत इंजिन पुढे गेल्याची माहिती मिळाली आहे.

  02616 नवी दिल्ली-चेन्नई सेंट्रल जीटी एक्स्प्रेस आपल्या नियोजित वेळेनुसार धावत होती. इटारसी-नागपूर सेक्शनदरम्यान पांढूर्णा रेल्वे स्थानक सोडल्यानंतर ही गाडी नागपूरच्या दिशेने येत होती. सकाळी 9.11 वाजताच्या सुमारास नरखेड-तिनखेडा दरम्यान दोन डब्यांना जोडणारे कपलिंग अचानक तुटले. मागचे तीन डबे मागेच ठेवून उर्वरित डबे घेऊन इंजिन पुढे निघाले. प्रेशर कमी झाल्याचे लोको पायलटच्या लक्षात आले. सोबतच मागच्या डब्यांची गती कमी झाल्याने गार्डच्याही लक्षात आले.

  गाडीची गती कमी असताना ही घटना घडली. यामुळे इंजिन काही अंतरच पुढे जाऊ शकले. लागलीच वरिष्ठांना घटनेची सूचना देण्यात आली. त्यासोबतच अपघात रिलीफ ट्रेनमधून आणि रेल्वे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले.

  घटनास्थळी पोहोचताच कर्मचाऱ्यांनी कपलींग दुरुस्त केले. दुरुस्तीनंतर सुमारे तासाभरात सकाळी 10.10 वाजता ही गाडी पुन्हा नागपूरच्या दिशेने निघाली. यागाडीची नागपूर स्थानकावर येण्याची वेळ 10.15 वाजताची आहे. पण, अपघातामुळे पोहचण्यास उशिर झाला. नंतर मात्र, बल्लारशा स्टेशनपर्यंत गाडीने झालेला उशीर भरून काढला.

  कपलिंग निघाले की गाडी थांबते. त्यातील प्रेशन निघाल्यामुळे गाडीला पुढे जाताच येत नाही. त्यामुळे गाडी थांबली. घटनेनंतर मदत पोहोचविण्यात आली. युध्दपातळीवर दुरुस्तीकार्य करण्यात आले. 45 मिनीटात हे काम पूर्ण झाले. घटनेत कुणीही जखमी झाले नाही किंवा रेल्वेचे कोणतेही नुकसान झाले नाही. अशी माहिती मध्य रेल्वे नागपूर विभागाचे सहायक वाणिज्य व्यवस्थापक एस. जी. राव यांनी दिली.

  अशाच प्रकारची घटना 18 मे रोजी सायंकाळी 5.30 च्या सुमारास घडली होती. विदर्भ एक्स्प्रेसचे इंजिन डबे सोडून पळाले होते. ही गाडी नागपूरच्या दिशेने येत होती. 3 महिन्यातील नागपूर विभागातील ही दुसरी घटना आहे.

  read_also content=”मुंबईतील कोरोना घालविण्यासाठी BMC चा जबरदस्त प्लान; नागरिकांचा बॉडी मास इंडेक्स तपासला जाणार~https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/corporation-to-conduct-survey-of-non-communicable-diseases-in-mumbai-citizens-body-mass-index-will-be-checked-nrvk-171732/”]