प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

रुग्णाचा मृत्यू (Death of Patient) झाल्यास किंवा योग्य उपचार न केल्याच्या नावाखाली जीव धोक्यात घालून रुग्णसेवा देणाऱ्या डाॅक्टरांवर हल्ला (attacks on doctors) होण्याच्या घटना सातत्याने वाढत आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनने (The Indian Medical Association) या घटनांची गंभीर दखल घेतली आहे.

    नागपूर (Nagpur).  रुग्णाचा मृत्यू (Death of Patient) झाल्यास किंवा योग्य उपचार न केल्याच्या नावाखाली जीव धोक्यात घालून रुग्णसेवा देणाऱ्या डाॅक्टरांवर हल्ला (attacks on doctors) होण्याच्या घटना सातत्याने वाढत आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनने (The Indian Medical Association) या घटनांची गंभीर दखल घेतली आहे. असे कृत्य करणाऱ्या रुग्णांचा उपचार न करण्याचा विचार असोसिएशनकडून केला जात आहे. नागपूर शाखेचे अध्यक्ष डाॅ. संजय देवतळे (Dr. Sanjay Devtale) यांनी याविषयी माहिती दिली.

    कोरोनाकाळात (During the Corona period) डाॅक्टरांनी (doctors) आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना रूग्णांची सेवा केली. कोरोना महामारीत अनेक डाॅक्टर आणि परिचारिकांनी आपले जीव देखील गमावले आहेत. कोरोनामुळे मृत्यु झाल्यानं रूग्णांच्या नातेवाईकांनी रूग्णालयात गोंधळ घालून डाॅक्टरांना मारहाण केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर डाॅक्टरांनी संपावर जाण्याचा देखील इशारा दिला होता.

    डॉक्टरांवर हल्ले करणाऱ्यांवर आणि त्यांच्या नातेवाईकांवर सरकारी किंवा खासगी रुग्णालयात डॉक्टर उपचार करणार नाहीत, असा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नागपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. संजय देवतळे यांनी दिला आहे. डॉक्टर व रुग्णालये यांच्यावरील हल्ल्यांच्या निषेधार्थ येत्या 18  जून रोजी देशभर निषेध दिन पाळण्यात येणार असल्याची माहिती डॉ. संजय देवतळे यांनी दिली आहे.

    मृत्युदर कमी राखण्यात राजकीय निर्णय, प्रशासकीय अंमलबजावणी यासह आरोग्य यंत्रणेचा अधिकचा वाटा आहे, हे नाकारून चालणार नाही. जीवाची पर्वा न करता डॉक्टर रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करीत असताना काही समाजकंटक डॉक्टरांवरच हल्ला करीत असल्यानं डॉक्टरांचे मनोधैर्य खचत आहे, असंही डॉ. संजय देवतळे यांनी म्हटलं आहे.

    दरम्यान, इंदोरमध्ये काही दिवसांपुर्वीच डाॅक्टरांवर हल्ल्याची गंभीर घटना घडली होती. त्यामुळे रूग्णालयात भीतीचं वातावरण तयार झालं होतं. डाॅक्टरांवर हल्ला करणाऱ्यांना कडक शिक्षा झाली पाहीजे, अशा भावना डाॅक्टर व्यक्त करत आहेत.