‘व्हीएनआयटी’ आणि ‘आयआयएम’ची गरुडझेप; रँकिंग स्पर्धेत ०५ नामवंत संस्थांना टाकले मागे

मागीलवर्षी 'व्हीएनआयटी' २७ व्या स्थानावर होती. यंदा संस्थेची काहीसी घसरण झाली असली तरी संस्थेचे श्रेणी गुण ५४.९४ इतके आहेत. याउलट ‘आयआयएम’ नागपूरने यंदाही आपले ४० वे स्थान कायम राखले आहे.

  नागपूर (Nagpur) : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून (the Union Ministry of Manpower Development) गुरुवारी घोषित करण्यात आलेल्या ‘नॅशनल इन्स्टिटय़ूशनल रँकिंग फ्रेमवर्क’तर्फे (NIRF) (एनआयआरएफ) अभियांत्रिकी संस्थांमध्ये विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय तांत्रिक संस्थेने (The Visvesvaraya National Institute of Technology) (व्हीएनआयटी) पाच नामवंत संस्थांना मागे टाकून ३० व्या स्थानावर झेप घेतली.

  मागीलवर्षी ‘व्हीएनआयटी’ २७ व्या स्थानावर होती. यंदा संस्थेची काहीसी घसरण झाली असली तरी संस्थेचे श्रेणी गुण ५४.९४ इतके आहेत. याउलट ‘आयआयएम’ नागपूरने यंदाही आपले ४० वे स्थान कायम राखले आहे.

  दरवर्षी देशभरातील विद्यापीठ, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, कृषी, वैद्यकीय, औषधनिर्माण आणि विधि शाखेतील महाविद्यालयांचे मानांकन जाहीर करण्यात येते. विद्यापीठ आणि महाविद्यालयांची गुणवत्ता तपासून हे मानांकन ठरवण्यात येते. गेल्या पाच वर्षांपासून पहिल्या दोनशे महाविद्यालय, विद्यालयांचा समावेश त्यात केला जातो. यंदाच्या मानांकनामध्ये व्हीएनआयटीने बीट्स पीलानी, आयआयटी मंडी, थापर इन्स्टिटय़ूट, जामिया मिलीया इस्लामिया आणि इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ स्पेस सायन्स अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी या संस्थांना मागे टाकले आहे.

  अभियांत्रिकीमध्ये रामदेवबाबा महाविद्यालय ३७.२२ श्रेणी गुणांसह ११९ तर जी.एच. रायसोनीला १३० वे स्थान मिळाले आहे. नागपूर विद्यापीठाच्या लक्ष्मीनारायण इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीने १३६ वे स्थान तर यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयाने १४९ वे स्थान पटकावले आहे. वैद्यकीय संस्थांमध्ये दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाने ३४ स्थानावर झेप घेतली आहे.

  नागपूर विद्यापीठाचे मानांकन घसरले
  मध्य भारतातील सर्वात जुन्या असणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे मानांकन घसरल्याचे दिसून आले. नागपूर विद्यापीठाला २०० विद्यापीठांच्या मानांकन यादीमध्ये १५१ वरून २०० या मानांकन श्रेणीमध्ये ठेवण्यात आले आहे. याशिवाय कामठी येथील किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसीला ४६ वे स्थान मिळाले. याशिवाय शासकीय विज्ञान संस्थेला ६१ तर याच संस्थेतील फॉरेन्सिक विभागाला ८८ वे स्थान मिळाले.