वाढत्या कोरोना रुग्ण संख्येने प्रशासनाची झोप उडवली; अखेर नागपुरात लॉकडाऊन जाहीर

विदर्भात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. अमरावतीमध्ये लॉकडाऊन झालानंतर आता नागपुरातही लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. पालकमंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांच्या अध्यक्षतेखाली नागपुरातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर नागपुरात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

    नागपूर : वाढत्या कोरोना रुग्ण संख्येने प्रशासनाची झोप उडवली आहे. अखेर नागपुरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. १५ मार्चपासून ते २१ मार्चपर्यंत नागपुरात कडक लॉकडाऊनची घोषणा नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी केली आहे.

    विदर्भात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. अमरावतीमध्ये लॉकडाऊन झालानंतर आता नागपुरातही लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. पालकमंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांच्या अध्यक्षतेखाली नागपुरातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर नागपुरात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

    मागील काही दिवसांपासून नागपुरात कोरोना रुग्णांचा आकडा सातत्यानं वाढत आहे. बुधवारी नागपुरात एकाच दिवसात १७१० नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

    १५ मार्चपासून ते २१ मार्चपर्यंत नागपुरात कडक लॉकडाऊन असणार आहे. लॉकडाऊन काळात विनाकारण फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक सेवा, दवाखाने बँका, ऑनलाईन फुड डिलीव्हरी, अंडे, मांस विक्री यांची दुकाने सुरु असणार आहेत. तर, दारुची दुकाने बंद ठेवली जाणार आहे.