कोरोनाला संपविण्यासाठी खुर्सापार पॅटर्न ठरतोय रामबाण; केंद्र शासनानेही केले कौतुक

नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील खुर्सापार गावाने (The village of Khursapar in the district) कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन (the Corona by strictly following the Corona rules) करून कोरोनाला हरविले आहे. विशेष म्हणजे, खुर्सापार ग्रामपंचायतीच्या या अनोख्या पॅटर्नची दखल थेट केंद्र सरकारने (the Central Government) घेतली असून गावकऱ्यांच्या प्रयत्नांचे कौतुकही केले आहे.

  नागपूर (Nagpur).  जिल्ह्यातील खुर्सापार गावाने (The village of Khursapar in the district) कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन (the Corona by strictly following the Corona rules) करून कोरोनाला हरविले आहे. विशेष म्हणजे, खुर्सापार ग्रामपंचायतीच्या या अनोख्या पॅटर्नची दखल थेट केंद्र सरकारने (the Central Government) घेतली असून गावकऱ्यांच्या प्रयत्नांचे कौतुकही केले आहे. या पॅटर्नची नोंद केंद्राच्या पंचायतराज विभागाने (the Centre’s Panchayat Raj Department) घेतली आहे. ‘बेस्ट पॅ्रक्टिसेस टू फाईव्ह कोव्हिड-19 बाय पंचायत ऑफ महाराष्ट्र’ (Best Practices to Five Covid 19 by Panchayat of Maharashtra) पुस्तकात खुर्सापार पॅटर्नची नोंद करण्यात आली आहे.

  खुर्सापार पॅटर्न काय आहे?

  – सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी; लाऊडस्पीकरद्वारे कोरोनाविषयी जनजागृती

  – गावात सोशल डिस्टन्सिंगचे पालन, मास्क अनिवार्य

  – दर महिन्यात क्लोरिन फवारणी आणि धुरळणी

  – गावात ठिकठिकाणी वॅाशबेसीन आणि विलीगीकरण केंद्र

  – 24 मार्च 2020 पासूनच उपाययोजना राबवण्यास सुरुवात

  – सरकारी सूचनांचं काटेकोरपणे पालन

  – युवकांची वार्डनिहाय कोव्हिडयोद्धा म्हणून नियुक्ती

  – शासकीय आणि सार्वजनिक इमारतींना सॅनिटायझर सेन्सॉर मशीन लावल्या

  – कोरोना नियम मोडणाऱ्यांवर सीसीटीव्हीचा वॅाच

  – चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावले

  – बाहेरील लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी होमगार्ड

  – कोरोनाशी लढा देण्यात खुर्सापार गावातील कोरोना योध्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

  खुर्सापार गावाने कोरोनाशी लढा दिला, यात गावातील आरोग्य केंद्राचीही महत्त्वाची भूमिका आहे. शिवाय आशा वर्कर यांनी घराघरात जावून जनजागृती केली. गावातील शाळेत विलीगीकरण केंद्र तयार केलंय, पण कोरोनाशी चांगला लढा दिल्याने गावातील विलीगीकरण केंद्रात आतापर्यंत एकाही रुग्णाला ठेवण्याची वेळ आली नाही.

  सध्या महाराष्ट्रात कोरोनाची अवस्था वाईट आहे. केंद्र आणि राज्य सरकार मिळून कोरोनाला संपविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. अशा परिस्थितीत खुर्सापार पॅटर्नच्या मदतीने उपाय योजना केल्यास कोरोनाला हरविणे फारसे कठीण नाही.