प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

एखाद्या व्यक्तीचे किंवा बालकाचे अपहरण (kidnapping) करून पैशाची मागणी (to demand money) करण्यात आल्याच्या अपहरणाच्या अनेक बातम्या आपण वाचतो. मात्र, एका विकृत मनोवृत्तीच्या (a perverted accused) आरोपीने (accused) १५ वर्षांच्या मुलाचे खंडणीत चक्क नरमुंडाची मागणी केली. तो एवढ्यावरच थांबला नाही त्याने मुलाची हत्या करून मृतदेह बेवारस फेकून दिला.

    नागपूर (Nagpur).  एखाद्या व्यक्तीचे किंवा बालकाचे अपहरण (kidnapping) करून पैशाची मागणी (to demand money) करण्यात आल्याच्या अपहरणाच्या अनेक बातम्या आपण वाचतो. मात्र, एका विकृत मनोवृत्तीच्या (a perverted accused) आरोपीने (accused) १५ वर्षांच्या मुलाचे खंडणीत चक्क नरमुंडाची मागणी केली. तो एवढ्यावरच थांबला नाही त्याने मुलाची हत्या करून मृतदेह बेवारस फेकून दिला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी (MIDC police) आरोपी सूरज शाहू (Suraj Shahu) याला अटक केली आहे.

    मृत राज पांडे एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील इंदिरा माता नगरमध्ये राहतो. MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीतून क्रिकेट खेळायला गेलेल्या राजचे दुचाकीस्वाराने गुरूवारी सायंकाळी 6 च्या सुमारास अपहरण केले. मुलगा घरी परतला नाही म्हणून घरची मंडळी काळजीत होते. त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांकडून युवकाचा तपास सुरू होता. याचवेळी अपहरणकर्त्याचा राज पांडेच्या पालकांना फोन आला. ‘तुमच्या मुलाचे अपहरण करण्यात आले असून त्याची सुखरूप सुटका करायची असेल तर अमुक एका व्यक्तीचे शीर आणून द्या’, या मागणीमुळे पालकांसह पोलीसही चक्रावले होते. आईच्या शोषणाचा बदला घेण्यासाठी आरोपी सुरजनं हे पाऊल उचलल्याचं समजतंय.

    मागणी पूर्ण न झाल्यानं आरोपीनं मुलाची हत्या करुन मृतदेह रिंगरोड परिसरात फेकून दिला होता. पोलीस या हत्येप्रकरणी अधिक तपास करत आहेत. मात्र ताब्यात घेतलेल्या आरोपीच्या चेहऱ्यावर या घटनेची कोणताच परिणाम दिसत नाही.