साळीवर आले मन; पण तिच्या नकारामुळे आलोक झाला वेडेपिसा, पाच मिनिटांच्या Audio क्लिपने केला हत्याकांडाचा उलघडा

नागपूर तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच कुटुंबातील 5 लोकांची हत्या करून नंतर आलोक माटूळकर आरोपीने (Accused Alok Matulkar) आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला होता. नागपूरात 21 जून रोजी घडलेल्या त्या हत्यांकाडाचा दिवस आठवला कि अंगावर काटा उभा राहतो.

    नागपूर (Nagpur).  नागपूर तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच कुटुंबातील 5 लोकांची हत्या करून नंतर आलोक माटूळकर आरोपीने (Accused Alok Matulkar) आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला होता. नागपूरात 21 जून रोजी घडलेल्या त्या हत्यांकाडाचा दिवस आठवला कि अंगावर काटा उभा राहतो. आलोकने अत्यंत क्रूरपणे पाच जणांची हत्या करून नंतर स्वत: आत्महत्या केली होती. या प्रकरणात नवनव्या अपडेट समोर येत आहे.

    आलोक वासनेत इतका आंधळा झाला होता की त्याला बायको विजयापेक्षा अनिषामध्ये अधिक रुची होती. (Nagpur Crime News) त्यामुळे अलोक स्वतःच्या बायकोपेक्षा अनिषावर अधिक अधिकार गाजवायचा. त्यामुळे तिने कोणासोबत बोलणे, कोणाच्या साधे संपर्कात राहणे देखील अलोकला मान्य नव्हते. अनिशा आपल्यापासून दूर जाऊ नये यासाठी तिच्यावर वशीकरण मंत्राचा वापर करीत होता. कामुकतेबद्दल यूट्यूबवरून माहिती काढायचा व अनिषाला नियंत्रित करण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होता. मात्र अनिशाला हे मान्य नव्हतं. तिला स्वतःचं आयुष्य स्वतंत्रपणे जगायचे होते. त्यात तिला आलोकला हस्तक्षेप मुळीच मान्य नव्हता. यावरून दोघात खटके उडायचे. (Nagpur Big Crime news)

    या हत्याकांडाची सुरुवात काही दिवसांपूर्वी झाली होती. अमिषाने आलोकविरोधात 24 एप्रिल रोजी पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार केली होती. आलोक मारहाण करतो, मानसिक व शारिरीक त्रास देत असल्याचं त्या तक्रारीत होतं. त्यामुळे दोघांमधील वाद विकोपाला गेला होता. अमिषाने आलोकचा मोबाइल नंबर ब्लॉक केला होता. मात्र आलोक अमिषासाठी वेडा झाला होता, आणि तरीही तो तिला मेसेज करीत होता. मिळालेल्या माहितीनुसार आलोकने तिला मोबाइलवरील मेसेजमध्ये अल्टिमेटम दिलं होतं. याशिवाय काही दिवसात माझ्यासोबत संवाद साधला नाहीस तर याची परिणाम वाईट होतील असंही त्याने यात म्हटलं होतं. त्याच कालावधीत आलोकने ऑनलाइन सुरा मागविल्याची शक्यता आहे.