नागपूरमध्ये धोका वाढला, म्यूकर मायकोसिसचे एकूण १०८६ रुग्ण समोर

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या (the Public Health Department) कार्यक्षेत्रातील गोंदिया जिल्ह्यात (in Gondia district) रविवारी रात्री ब्लॅक फंगस अर्थात म्युकर मायकोसिसच्या पहिला मृत्यू (The first death of black fungus) नोंदवला गेला आहे. यासोबतच विभागातील नागपूर जिल्ह्यात म्युकरचे आणखी तीन मृत्यू झाल्यानं विभागातील म्युकर बळींची संख्या आता ५२ वर गेली आहे.

  नागपूर (Nagpur).  सार्वजनिक आरोग्य विभागाच्या (the Public Health Department) कार्यक्षेत्रातील गोंदिया जिल्ह्यात (in Gondia district) रविवारी रात्री ब्लॅक फंगस अर्थात म्युकर मायकोसिसच्या पहिला मृत्यू (The first death of black fungus) नोंदवला गेला आहे. यासोबतच विभागातील नागपूर जिल्ह्यात म्युकरचे आणखी तीन मृत्यू झाल्यानं विभागातील म्युकर बळींची संख्या आता ५२ वर गेली आहे. (Mukar victims in the division to 52)

  कोविड पश्चात म्युकरनं विळखा घातल्याने बरेच रुग्ण उपचारासाठी नागपुरात रेफर करण्यात आले आहेत. त्यामुळं मृत्यूची ही संख्या वाढण्याची भिती व्यक्त होत आहे. हा सगळा घटनाक्रम घडत असताना नव्यानं म्युकर मायकोसिसचं निदान झालेल्या आणखी ३२ जणांची भर पडली आहे. यातही नागपूर जिल्ह्यानं बाजी मारली आहे.

  नागपूरमधील म्युकरची परिस्थिती
  – विभागातील म्युकरची रुग्ण संख्या- १०८६
  – नागपूर जिल्ह्यातील रुग्ण – ९६३
  – विभागातील म्यूकर बळी- ५२
  – दोघांचा खासगीत तर एकाचा मेयोत मृत्यू

  अधिक माहितीनुसार, जिल्ह्यात म्युकरचं संक्रमण झालेल्या नव्या २४ जणांची भर पडली आहे. त्यामुळं विभागातील म्युकरग्रस्तांची संख्या आता संख्या १ हजार ८६ रुग्णांवर पोहचली आहे. त्यात सर्वाधिक ९६३ रुग्णांचा समावेश आहे. तर विभागातील नवीन मृत्यूमुळे नागपुरातील आजपर्यंतच्या मृत्यूची संख्या ४९ तर विभागातील मृत्यूची संख्या ५२ वर पोहचली आहे.

  दरम्यान, तपासण्यांच्या तुलनेत शहरातील करोना बाधितांची संख्या कमी होत असताना ग्रामीणमध्ये मात्र ती वाढती आहे. शनिवारी शहरात ४४५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तर ग्रामीणमध्ये तपासण्या कमी होऊनही ६३१ नवे बाधित नोंदविले गेले. जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा १ हजार ८६ आहे.

  शनिवारी १९ हजार ६३७ तपासण्यांचा अहवाल प्राप्त झाला. शहरात १३ हजार ७२२ तर ग्रामीणमध्ये ५ हजार ९१५ तपासण्या करण्यात आल्या. शहराच्या तुलनेत ग्रामीणमधील तपासण्यांची संख्या कमी असतानाही रुग्णसंख्या मात्र अधिक आहे. तपासण्यांच्या तुलनेत शहरात ३.२४ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून ग्रामीणमध्ये हे प्रमाण १०.६६ टक्के आहे. ग्रामीणमधील संकट निवारण्यासाठी विशेष खबरदारी घेण्याची गरज व्यक्त होत आहे.