विदर्भात उष्णतेचा कहर वाढतोय; उन्हाळा कडक असण्याची शक्यता

चंद्रपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यात उष्णतेचा पार वाढतच चालला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा उन्हाळा कडक असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये शनिवारी तापमानाचा पारा चाळीशीपार गेला होता.

    नागपूर : विदर्भात कोरोनासह उन्हाचाही कहर सुरू आहे. विदर्भातील चंद्रपूरचे तापमान शनिवारी 43.4 अंशावर पोहोचले. विशेष म्हणजे चंद्रपूर हे शहर केवळ देशातील नव्हे तर जगातील उच्चांकी तापमान असलेले चौथे शहर ठरले आहे.

    चंद्रपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यात उष्णतेचा पार वाढतच चालला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा उन्हाळा कडक असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये शनिवारी तापमानाचा पारा चाळीशीपार गेला होता.

    चंद्रपूरसह परभणी 41.1, मालेगाव 40.2, जळगाव 41.2, नांदेड 41 आणि सोलापूरमध्ये 40.8 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले. एकीकडे, महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत कोरोनाची सर्वाधिक रुग्णसंख्या असताना त्यात नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे.