सलून व्यवसायाच्या आड ‘सेक्स रॅकेट’चा धंदा; पोलिसांची छापामार कारवाई

नागपूर पोलिसांनी सलूनमध्ये देहव्यापार करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीसह दोन महिलांची सुटका केली. धक्कादायक बाब, म्हणजे या प्रकरणात आरोपी महिलेचे नातेवाईकही सामील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

    नागपूर (Nagpur): कोरोनाचे प्रमाण कमी होताच (the number of corona dwindled) प्रशासनाने (the administration) अनेक व्यावसायिकांना (professionals) सवलत दिली. मात्र, काही व्यावसायिक याचा गैरफायदा (Disadvantage) घेत असल्याचे आढळून आले आहे. इमामवाडा पोलिस स्टेशन (the Imamwada police station) हद्दीअंतर्गत येणाऱ्या मेडिकल चौक (the Medical Square) भागात एक पॉश बिल्डिंगमध्ये सुरू असलेल्या सलूनमध्ये (the salon) सुरू असलेल्या देहव्यापाराचा पोलिसांनी भंडाफोड केला.

    पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं असून अल्पवयीन मुलीसह दोन महिलांची यातून सुटका केली आहे. इमामबाडा पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या सलूनमध्ये देहव्यापार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी या सलूनवर छापेमारी करून एका व्यक्तीला अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.

    तर नागपूर पोलिसांनी सलूनमध्ये देहव्यापार करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीसह दोन महिलांची सुटका केली. धक्कादायक बाब, म्हणजे या प्रकरणात आरोपी महिलेचे नातेवाईकही सामील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे त्यांचा शोध सुरू आहे. आरोपी महिला आणि तिच्या नातेवाईकां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.