यंत्रणा सज्ज आहे; मात्र केंद्राकडून लसींचा पुरवठा समाधानकारक होत नाही– उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

  नागपूर (Nagpur) :  कोरोनाच्या तिसरी लाटेची शक्यता (the possibility of a third wave of corona) बघता राज्यात मोठय़ा प्रमाणात लसीकरण होणे गरजेचे (to be vaccinated on a large scale) आहे. त्यासाठी यंत्रणा सज्ज आहे; मात्र केंद्राकडून लसींचा पुरवठा समाधानकारक (the supply of vaccines from the Center Govt.) होत नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी लसपुरवठय़ाबाबत (the supply of vaccines) खंत व्यक्त केली.

  मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलाच्या प्रांगणात विदर्भ सहायता सोसायटी आणि महापारेषण यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सद्भावना जीवनरथ’ या दोनशे लसीकरण वाहनांचे हस्तांतरण मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत दृकश्राव्य प्रणालीद्वारे करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

  या कार्यक्रमाला पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर तसेच दृकश्राव्य पद्धतीने आरोग्य मंत्री राजेश टोपे, कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे, प्रधान सचिव दिनेश वाघमारे आदी प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

  राज्यात ५ कोटीपेक्षा जास्त नागरिकांना पहिली व दुसरी मात्रा देण्यात आली आहे. राज्यात दररोज ५ लाख नागरिकांना लस देता येईल, अशी व्यवस्था आहे मात्र लसीचा पुरवठा होत नाही. जे नागरिक लसीकरण केंद्रांपर्यंत पोहचू शकत नाहीत, अशा नागरिकांच्या घरी जाऊन लसीकरण करण्यासाठी लसीकरण वाहने उपयुक्त ठरतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

  यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे, यशोमती ठाकूर, सुनील केदार यांची भाषणे झाली. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत म्हणाले, या वाहनांचा सुयोग्य वापर व्हावा तसेच वाहनाची देखभाल करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी नियंत्रण अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. संचालन विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे- वर्मा यांनी तर आभार जिल्हाधिकारी विमला आर. यांनी मानले.

  विकास ठाकरेंच्या अनुपस्थितीची चर्चा
  वाहन हस्तांतरण कार्यक्रम ज्या विधानसभा मतदारसंघात झाला त्या मतदारसंघाचे आमदार व काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे मात्र या कार्यक्रमाकडे फिरकले नाही. काँग्रेसचे राज्यातील सर्वच वरिष्ठ नेते येथे उपस्थित असतानाही ठाकरे न आल्याने त्यांच्या अनुपस्थितीची चर्चा चांगलीच रंगली होती.