प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

नागपुरात काही भाज्या चिकनपेक्षाही महाग झाल्या आहेत (Nagpur Vegetable Price). नागपुरात सध्या चिकनचा दर 200 रुपये किलो आहे. पण, मेथी, फरसबी, शेवगा, वाल या भाज्या किरकोळ बाजारात 250 रुपये किलो दराने विकल्या जात आहेत.

    नागपूर (Nagpur). बाजारात काही भाज्या चिकनपेक्षाही महाग झाल्या आहेत (Nagpur Vegetable Price). नागपुरात सध्या चिकनचा दर 200 रुपये किलो आहे. पण, मेथी, फरसबी, शेवगा, वाल या भाज्या किरकोळ बाजारात 250 रुपये किलो दराने विकल्या जात आहेत. (Nagpur Vegetable Price Hike Became More Expensive Than Chicken Due To Damage By Heavy Rainfall)

    आवक कमी झाल्याने सध्या नागपूरच्या किरकोळ बाजारात चिकनपेक्षाही भाजीपाला महागल्याची स्थिती आहे. पावसामुळे भाजीपाल्याचे नुकसान झालंय. त्यामुळे सर्वच भाज्यांच्या दरात दुप्पटीपेक्षा अधिक वाढ झालीये. याचा ग्राहकांच्या बजेटवर मोठा परिणाम होतोय.

    भाज्या दर               प्रति किलो
    मेथी                       250 रुपये किलो
    फरसबी                  250 रुपये किलो
    टोमॅटो                    50 रुपये किलो
    कोथिंबीर              120 रुपये किलो
    पत्ताकोबी             80 रुपये किलो
    दोडका                  120 रुपये किलो
    भेंडी                     120 रुपये किलो
    शेवगा                  250 रुपये किलो
    फ्लावर                120 रुपये किलो
    वाल                    250 रुपये किलो
    वांगी                   80 रुपये किलो

    भाजीपाल्याची आवक कमी
    राज्यभर सुरु असलेल्या पावसामुळे मुंबईत भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे बाजारभाव वाढले आहेत. मुंबईत पुणे, सातारा, दक्षिणेकडील राज्य, नाशिक आणि इतर ठिकाणावरुन भाजीपाल्याची आवक सुरु आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्यामुळे दर वाढले आहेत.

    भाज्यांनी शंभरी पार केली आहे. इंधन दरवाढ शंभरी पार केल्यानंतर भाज्याही महाग झाल्या आहेत आणि पावसामुळे आवक पण कमी झाली असल्यामुळे याचा परिणाम गृहींनींच्या बजेटवर झाला आहे. लोकांच्या खिशाला कात्री बसत आहे. तसेच विक्रेत्यांनाही 30 ते 40 टक्के फटका सहन करावा लागत आहे.

    भाजी दर        प्रति किलो
    मटार              100 रुपये किलो
    भेंडी                40 रुपये किलो
    फरसबी          100 रुपये किलो
    पडवळ           60 रुपये किलो
    गवार            60 रुपये किलो
    कोबी            28 रुपये किलो
    आलं            36 रुपये किलो
    वांगी            48 रुपये किलो
    शिमला        32 रुपये किलो
    शेंगा           40 रुपये किलो