नागपुरात डायरेक्ट लॉकडाऊन नाही, पण… ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची मोठी घोषणा

राज्यात कोरोनाचा धोका वाढला आहे. मुंबई आणि विदर्भात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. अमरावतीत लॉकडाऊन लावण्यात आल्या आहेत. तर, नागपुरात लॉकडाऊन नाही, पण कठोर निर्बंध लावण्याची घोषणा नागपुरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी केली आहे.

    नागपूर : राज्यात कोरोनाचा धोका वाढला आहे. मुंबई आणि विदर्भात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. अमरावतीत लॉकडाऊन लावण्यात आल्या आहेत. तर, नागपुरात लॉकडाऊन नाही, पण कठोर निर्बंध लावण्याची घोषणा नागपुरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी केली आहे.

    नागपूर शहरात कोरोना संक्रमण वाढत असल्यामुळे शहरातील बंद करण्यात आलेले कोविड सेंटर सुरु करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. आरोग्य पथकाच्या गृहभेटी संख्या वाढवण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत. तसेच नागरीकांनी कोरोना नियमावलीचे पालन करावे असे आवहनही त्यांनी केले आहे.

    नागपुरात लॉकडाऊन नाही, मात्र मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई होणार. ७ मार्चपर्यंत आठवडी बाजार, शाळा कॉलेज बंद राहणार. तसेच रिसॉर्ट, मंगल कार्यालये देखील सात मार्चपर्यंत बंद ठेण्याचे आदेश दिल्याचे नितीन राऊतांनी सांगीतले.