प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षण, प्रगतीसाठी प्राप्त निधी खर्च करण्यात कुचराई करणाऱ्या महाज्योतीने नागपूर येथील मुख्यालयाच्या कामासाठी (headquarters work in Nagpur) मात्र सार्वजनिक बांधकाम खात्याला (the Public Works Department) ३६ लाख रुपये दिले आहेत. मात्र, गेल्या पाच महिन्यांपासून कार्यालयाच्या कामाला अद्याप सुरुवात देखील झालेली नाही.

  नागपूर (Nagpur).  विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षण, प्रगतीसाठी प्राप्त निधी खर्च करण्यात कुचराई करणाऱ्या महाज्योतीने नागपूर येथील मुख्यालयाच्या कामासाठी (headquarters work in Nagpur) मात्र सार्वजनिक बांधकाम खात्याला (the Public Works Department) ३६ लाख रुपये दिले आहेत. मात्र, गेल्या पाच महिन्यांपासून कार्यालयाच्या कामाला अद्याप सुरुवात देखील झालेली नाही.

  वित्त विभाग व ओबीसी मंत्रालयाकडून प्राप्त माहितीनुसार, ऑक्टोबर २०२० मध्ये महाज्योतीला ९.५ कोटी रुपये प्राप्त झाले. त्यानंतर १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची मान्यता मिळाली. असे असताना महाज्योतीने केवळ तीन कोटी ७५ लाख रुपये खर्च केले. ऑक्टोबर ते फेब्रुवारी या पाच महिन्यात करोनाची स्थिती इतकी वाईट नव्हती. पण, या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष यांच्या निष्काळजीपणामुळे ही रक्कम पूर्ण खर्च होऊ शकली नाही, असा आरोप संचालक मंडळाच्या सदस्यांचा आहे.

  महाज्योतीने जे ३ कोटी ७५ लाख रुपये खर्च केले, यामध्ये २.५ कोटी रुपयांचा खर्च वाणिज्यिक वैमानिकाच्या प्रशिक्षणासाठी तर ३६ लाख रुपये हे बांधकाम खात्याला देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, वैमानिकाच्या प्रशिक्षण योजनेला आणि कार्यालयाच्या बांधकामाला पाच महिन्यांपासून प्रारंभ झाला नाही. ही रक्कम वजा केल्यास महाज्योतीने गेल्या वर्षभरात केवळ ९० लाख रुपये खर्च केले.

  निबंधांचे पुन्हा परीक्षण व्हावे
  महाज्योतीने घेतलेल्या निबंध स्पर्धेतील निबंधांचे परीक्षण तज्ज्ञांच्या समितीकडून न करता एकमेव परीक्षकांकडून करवून घेण्यात आले. संचालक मंडळाच्या सूचनेकडे दुर्लक्ष करण्यात आले. या स्पर्धेच्या निकालावर संचालक मंडळाच्या सदस्यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर स्पर्धकांनी निकाल अमान्य असल्याचे म्हटले आहे. तज्ज्ञांकडून परीक्षण करून निकाल लावावा, अशी मागणी स्पर्धाकांकडून होत आहे.

  वाणिज्यिक वैमानिक प्रशिक्षणाचा फेरविचार
  वाणिज्यिक वैमानिक प्रशिक्षणासाठी एका विद्यार्थ्यांवर २५ लाख रुपये खर्च करण्याची महाज्योतीची योजना आहे. संस्थेने पहिल्याच वर्षी हा अभ्यासक्रम सुरू करण्याच्या कार्यक्रम आखला. पण सुरू करता आला नाही. आता करोनामुळे विमान कंपन्या डबघाईस आल्या आहेत. कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करत आहेत. हे क्षेत्र पूर्ववत होण्यास दोन वर्षे लागण्याची शक्यता आहे.