नागपूरमध्ये ३१ नवीन कोविड रुग्णालये होणार, मनपाचे आदेश

नागपुरात पुन्हा नव्याने ३१ नियमित कोविड रूग्णालये आता डेडिकेटेड कोविड रूग्णालयात परीवर्तीत होणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच नागपुरात आता कोविड रुग्णालयांची एकूण संख्या ६२ झाली आहे.

नागपूर : नागपूरमध्ये कोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. त्यामुळे कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, नागपुरात पुन्हा नव्याने ३१ नियमित कोविड रूग्णालये आता डेडिकेटेड कोविड रूग्णालयात परीवर्तीत होणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच नागपुरात आता कोविड रुग्णालयांची एकूण संख्या ६२ झाली आहे.

पालिकेने दिलेल्या आदेशात नमूद केल्यानुसार, २४ तासात रुग्णालयांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील ४८ तासात कोविड-१९ पॉझिटिव्ह रुग्ण संबंधित रुग्णालयांना भरती करता येणार आहे.

पालिकेने २४ तासात संबंधित रुग्णालयांकडून सदर रुग्णालय कोविड रुग्ण दाखल करून सज्ज असल्याबाबतचा अहवाल मागवला आहे. तसेच जे रुग्ण दाखल होतील त्यांच्यावर शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार उपचार करण्यात यावा, असेही आदेशात नमूद केले आहे. दाखल करण्यात आलेल्या रुग्णांचा रिअल टाईम अहवाल मनपाच्या पोर्टलवर नियमित अद्यावत करणे अनिवार्य राहील.