नागपूरमध्ये हजारो रुग्णांवर घरीच सुरू आहेत उपचार, हॉस्पिटलमध्ये बेड शिल्लक नसल्याचा परिणाम

नागपूरमध्ये बेड मिळत नसल्याने हजारो रुग्णांवर सध्या घरीच उपचार सुरू आहेत. सध्या ६० हजारांपेक्षाही अधिक नागरिक घरी उपचार घेत आहेत. आरोग्यसाधनांचा तुडवडा एकीकडे आणि फुल्ल भरलेली रुग्णालयं दुसरीकडे अशी परिस्थिती आहे. गेल्या २४ तासांत नागपूरमध्ये ७ हजार ७७१ नवे रुग्ण सापडले असून ८७ नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. 

    देशात कोरोनाची दुसरी लाट धुमाकूळ घालतेय. या लाटेत आतापर्यंत लाखो लोक बाधित झालेत. देशात एका दिवसांत आढळणाऱ्या रुग्णांची संख्या ही ३ लाखांच्याही वर पोहोचलीय. अशा परिस्थितीत अनेक रुग्णांना रुग्णालयात बेडच उपलब्ध होत नसल्यामुळे त्यांचे चांगलेच हाल होतायत.

    नागपूरमध्ये बेड मिळत नसल्याने हजारो रुग्णांवर सध्या घरीच उपचार सुरू आहेत. सध्या ६० हजारांपेक्षाही अधिक नागरिक घरी उपचार घेत आहेत. आरोग्यसाधनांचा तुडवडा एकीकडे आणि फुल्ल भरलेली रुग्णालयं दुसरीकडे अशी परिस्थिती आहे. गेल्या २४ तासांत नागपूरमध्ये ७ हजार ७७१ नवे रुग्ण सापडले असून ८७ नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.

    नागपूर जिल्ह्यात कोरोना चाचण्यांचा वेग वाढवण्यात आलाय. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत अधिकच भर पडत असल्याचं चित्र आहे. रविवारी एका दिवसात कोरोनाचे नवे ७ हजार ७७१ रुग्ण आढळून आलेत. यात शहरी भागातील ४ हजार ७२० तर ग्रामीण भागातील ३ हजार ४० रुग्णांचा समावेश आहे.

    सध्या ६० हजार ७२४ कोरोनाबाधित रुग्ण होम क्वारंटाईन होऊन उपचार घेत आहेत. त्यापैकी ५ हजार १३० जणांनी कोरोनावर मात केलीय. आजारातून बरे होणाऱ्यांचं एकूण प्रमाण हे आता ७७.४२ टक्क्यांपर्यंत खाली आलंय. जानेवारी महिन्यापर्यंत हे प्रमाण ९० टक्के होतं.