विद्यार्थ्यांवर परीक्षेपासून वंचित राहण्याची वेळ; महाविद्यालयाच्या चुकांच्या परिणामाची विद्यार्थ्यांना शिक्षा

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या (Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University) हिवाळी २०२० च्या परीक्षेला (Winter 2020 exams) तांत्रिक बिघाडाने (due to technical problems) मुकलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेची संधी देण्यात आली होती. मात्र, अनेक महाविद्यालयांनी परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांची माहिती (the details of the students) विद्यापीठाकडे सादर न केल्याने (to the university) या विद्यार्थ्यांवर पुन्हा परीक्षेला मुकण्याची वेळ आली आहे.

    नागपूर (Nagpur).  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या (Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University) हिवाळी २०२० च्या परीक्षेला (Winter 2020 exams) तांत्रिक बिघाडाने (due to technical problems) मुकलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेची संधी देण्यात आली होती. मात्र, अनेक महाविद्यालयांनी परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांची माहिती (the details of the students) विद्यापीठाकडे सादर न केल्याने (to the university) या विद्यार्थ्यांवर पुन्हा परीक्षेला मुकण्याची वेळ आली आहे.

    विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांचा पहिला आणि दुसरा टप्पा २१ मार्च ते २४ एप्रिलदरम्यान घेण्यात आला. यादरम्यान काही पेपरमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने त्या परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला होता. यामध्ये एकूण प्रथम, तिसऱ्या, पाचव्या आणि सातव्या सत्रांतच्या २०० विषयांच्या पेपरचा समावेश होता. या रद्द झालेल्या परीक्षा २२ ते २६ मेदरम्यान सकाळी ८ ते ५.३० या कालावधीत घेण्यात येत आहेत. मात्र, या परीक्षा ज्या विद्यार्थ्यांना देता आली नाही, त्यांनी महाविद्यालयांकडे तक्रार करावयाची होती. यानंतर महाविद्यालयात आलेल्या तक्रारीची माहिती विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला पाठवायची होती. तक्रार करणाऱ्या ७ हजार ४०० विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश होता. मात्र, बऱ्याच महाविद्यालयांनी परीक्षा सुरू होऊनही विद्यार्थ्यांची माहिती विद्यापीठाकडे दिलेली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा हे विद्यार्थी परीक्षेला मुकण्याची वेळ आली आहे.

    २७ पासून २१ अभ्यासक्रमांच्या परीक्षा
    करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने विद्यापीठाने व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या काही परीक्षा स्थगित केल्या होत्या. या परीक्षांचे नवीन वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार २७ मे ते ९ जूनदरम्यान स्थगित झालेल्या २१ परीक्षा घेण्यात येणार आहेत.