petrol diesel price

  • पेट्रोल ५१ पैसे तर डिझेलमध्ये १.०६ रुपयांची घसरण

नागपूर. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे दर कमी झाल्याने देशात वाढत असलेल्या इंधन दरवाढीला  ब्रेक लागला आहे. पेट्रोलमध्ये (petrol) ५१ पैसे आणि डिझेलमध्ये (diesel) १.०६ रुपयांची घसरण होऊन पेट्रोळ मंगळवारला प्रति लीटर ८८.७७ रुपये आणि डिझेल ७९.६५ रुपयांवर स्थिरावले. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या द्रानुसार देशांतर्गत पेट्रोळ आणि डिझेलच्या दरात चढउतार होते. त्याचा परिणाम दररोज स्थानिक बाजारात दिसून येतो.

ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पेट्रोळची दरवाढ झाली होती. जूनमध्ये ७६.७७ रुपये असलेले पेट्रोलचे दर ७ सप्टेंबरपर्यंत ८९.२८ रुपये या सर्वांधिक उच्चांकावर पोहोचले होते. त्यानंतर १० सप्टेंबरला ९ पैशांची कपात होऊन ८९.१९ रुपयांपर्यंत खाली आले. १४ सप्टेंबरला ८८.९३ रुपये आणि १५ सप्टेंबरला ८८.७७ रुपयांपर्यंत खाली आले. तसेच सप्टेंबर महिन्यात डिझेल १.०६ रुपयांनी उतरले.