vegitable price hike

 नागपूर. भाजीचा स्वाद वाढविणारे टमाटर ( Tomatoes) आणि फोडणीसाठी आवश्यक कांद्याचे (onions) दर गगनाला भिडल्यामुळे किचनचे बजेट बिघडले ( out of budge) असून गृहिणींच्या डोळ्यात पाणी येत आहे. किरकोळ बाजारात भाजीपाल्याच्या किंमती ऐकून गरीब व सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावरील रंगच उडत आहे.

टमाटर ठोक बाजारात २५ रुपये तर किरकोळमध्ये ५० रुपये प्रति किलो विकला जात आहे. टमाटरसोबतच कांदा- बटाट्याने लोकांना घाम फोडला आहे. कळमना ठोक बाजारात कांदा व बटाट्याची चांगळी आवक आहे. परंतु क्वालिटी खराब असल्यामुळे भावात बरीच तफावत दिसत आहे. भाव अधिक असल्यामुळे लोकांना खरेदीसाठी विचार करावा लागत आहे. ठोकमध्ये बटाटे २५-३० रुपये किलो आहे. परंतु किरकोळ बाजारात ५० रुपयांप्रमाणे विकला जात आहे. भाजीमध्ये महत्त्वपूर्ण असलेले कांदा, बटाटे व टमाटर आता सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे.

५० टक्‍के पीक खराब 

व्यापारी मो. अफाक यांनी सांगितले की, पावसामुळे कांद्याचे ५० टक्के पीक खराब झाले आहे. त्यामुळे कांद्याचे दर ग्राहकांना रडवत आहे. सध्या जो माल येत आहे, तो ओला आहे. बऱ्याच मालाचा दर्जाही चांगला नाही. चांगल्या मालाचे भाव टाईट आहे. काही दिवसांपूर्वी ४००-९०० रुपये मन (४० किलो) विकणाऱ्या कांद्यात सोमवारी ४००-५०० रुपये वाढ झाल्यामुळे दर १४००-१५०० रुपयांवर पोहोचले. अर्थात ठोक बाजारातच कांदा ३१०५० रुपये किलो झाला आहे. याप्रमाणेच बटाटाही १०० रुपयाने महागला असून दर १०००-१२०० रुपयांवर पोहोचले आहे. भाजीपाला व्यापारी राम महाजन यांनी सांगितले की, पावसामुळे टमाटरचे पीकसुद्धा प्रभावित झाले आहे. त्यामुळे ठोकमध्येच २५-३० रुपये किलो विकल्या जात आहे. लोकल टमाटरची आवक अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे टमाटर महाग आहे. कॉटन मार्केट व कळमना मार्केटमध्ये (एकूण ११-१८ गाड्या टमाटरची आवक आहे.