तुकाराम मुंढेंचा आदेश डावलला, राज्य सरकारने जारी केल्या नव्या सूचना

नागपूरातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पालिकेने सर्व व्यापाऱ्यांना आणि त्यांच्याकडे कामाला असणाऱ्या नोकरदारांना कोरोनाची चाचणी करण्याचे निर्देश दिले होते. परंतु नागपूरमधील व्यापारी वर्गाने याला तीव्र विरोध केला आहे. याबाबत व्यापाऱ्यांनी बैठकही घेतली होती.

नागपूर : नागपूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनाचा संसर्ग नागपूरमध्ये वेगाने पसरत आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग रोगखण्यासाठी पालिका प्रशासनाने कडक पाऊलं उचलली आहेत. पालिकेच्या निर्णयाला व्यापाऱ्यांकडून तीव्र विरोध आहे. त्यामुळे व्यापारी वर्गाने पालिकेला विरोध केला आहे. त्यामुळे राज्य सरकारने नवीन सूचना जाहीर केल्या आहेत. यामुळे तुकाराम मुंढेंनी दिलेले आदेश डावलले गेले आहेत

नागपूरातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पालिकेने सर्व व्यापाऱ्यांना आणि त्यांच्याकडे कामाला असणाऱ्या नोकरदारांना कोरोनाची चाचणी करण्याचे निर्देश दिले होते. परंतु नागपूरमधील व्यापारी वर्गाने याला तीव्र विरोध केला आहे. याबाबत व्यापाऱ्यांनी बैठकही घेतली होती.

तसेच राज्य सरकारने नव्या सूचना जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये प्रवास करणाऱ्या किंवा जिल्ह्यात दाखल होणाऱ्या नागरिकांना तसेच व्यापाऱ्यास कोणत्याही प्रकारचे कोरोनाची लक्षण नसल्यास कोविड चाचणी करण्याची गरड नाही. अशा सूचनांचे परिपत्रक प्रधान सचिव प्रदीप व्यास यांनी काढले आहे. त्यामुळे नागपूरातील व्यापारी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने आयसीएमआरने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. तसेच एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लक्षण आढळल्यास त्याने तात्काळ आपला कोरोना चाचणी करावी असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.