नागपूरमध्ये तुकाराम मुंढेंवर पुष्पवृष्टी, समर्थकांनी अडवला ताफा

तुकाराम मुंढे हे निर्भिड आयुक्त आहेत. ते नेहमीच त्यांच्या रोखठोक आणि स्पष्ट भूमिकेमुळे नागरिकांच्या मनात भरले आहेत. त्यामुळे ते नागपूरहून मुंबईला रवाना होत असताना वाटेतच समर्थकांनी त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. तसेच त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. समर्थकांनी त्यांच्या गाडीच्या समोर येऊन अडवण्याचा देखील प्रयत्न केला.

नागपूर : नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची मुंबईत बदली करण्यात आली आहे. त्यांची आता मुंबईतील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर राधाकृष्णन बी, हे नागपूरचे नवे महापालिका आयुक्त आहेत. तुकाराम मुढे मुंबईकडे रवाना होत होते. वाटेतच त्यांच्या समर्थकांनी गाडी अडवली आणि घोषणाबाजी सुरु केली.

तुकाराम मुंढे हे निर्भिड आयुक्त आहेत. ते नेहमीच त्यांच्या रोखठोक आणि स्पष्ट भूमिकेमुळे नागरिकांच्या मनात भरले आहेत. त्यामुळे ते नागपूरहून मुंबईला रवाना होत असताना वाटेतच समर्थकांनी त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. तसेच त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. समर्थकांनी त्यांच्या गाडीच्या समोर येऊन अडवण्याचा देखील प्रयत्न केला.

नागपूरमधील जनतेने महापौर मुर्दाबाद आणि भाजप नेत्यांच्या विरोधात मुर्दाबादचे नारे लगावले. त्यामुळे समर्थकांची गर्दी आवरताना पोलीस प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली होती. तुकाराम मुंढेंना नागपूरवासीयांनी भरभरून प्रेम दिले आहे. तसेच तुकारा मुढे नागपूरमधील जनतेचं मन जिंकण्यात यशस्वी झाल्याचे चित्र दिसत होते.
नागपूर महापालिका आयुक्त तुकारमा मुंढेंचा कार्यकाळ वादाच्या भोवऱ्यातच होता. सत्ताधारी भाजपविरुद्ध प्रशासन अशा कचाट्यात सापडले होते. त्यांच्या कार्यावर अनेक आरोपही करण्यात आले होते. तसेच आरोपांमुळे तुकाराम मुंढे यांना काही दिवसांपूर्वी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने नोटीस बजावली होती.