मामा, बघा ना! आईने गळफास घेतला; चिमुकल्याचा थरथरत्या आवाजाचा व्हिडिओ व्हायरल

घटस्फोट घेतल्यानंतर (After the divorce) पोटच्या १२ वर्षांच्या मुलासोबत विभक्त राहणाऱ्या महिलेने गळफास घेत आत्महत्या केली. (committed suicide by strangulation) आईचा छताला लटकलेल्या मृतदेह (mother body hanging on the roof) पाहून तो बालकही घाबरला. काय करावे हे त्याला सुचेना! अखेर मामाला व्हिडिओ कॉल करून तो रडक्या आवाजात....

    नागपूर (Nagpur). घटस्फोट घेतल्यानंतर (After the divorce) पोटच्या १२ वर्षांच्या मुलासोबत विभक्त राहणाऱ्या महिलेने गळफास घेत आत्महत्या केली. (committed suicide by strangulation) आईचा छताला लटकलेल्या मृतदेह (mother body hanging on the roof) पाहून तो बालकही घाबरला. काय करावे हे त्याला सुचेना! अखेर मामाला व्हिडिओ कॉल करून तो रडक्या आवाजात म्हणाला ‘मामा, बघा ना! आईनं गळफास घेतला.’ त्याची ती स्थिती पाहून मामालाही रड आवरला नाही. मन पिळवटून टाकणारी घटना नंदनवन (Nandanvan area, Nagpur) भागात शुक्रवारी घडली.

    प्रेरणा नारायण भिवनकर-राऊत असं आत्महत्या केलेल्या 42 वर्षीय महिलेचं नाव आहे. मृत प्रेरणा यांचा सहा वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. त्यामुळे त्या आपल्या 12 वर्षीय मुलाला घेऊन नागपूर येथील नंदनवन परिसारातील देवलक्ष्मी अपार्टमेंटमध्ये राहत होत्या. त्या नागपूरातील एका खाजगी कंपनीत नोकरी करत आपल्या मुलाचा सांभाळ करत होत्या. पण काल दुपारच्या सुमारास मुलगा बाहेर खेळायला गेला असता, त्यांनी गळफास लावत आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे.

    मुलगा घरी परतला अन् त्यानं आपल्या आईचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत पाहिला. घरातील चित्र पाहून त्यांची घाबरगुंडी उडाली. घरात इतर कोणी नसल्यानं त्यानं आपल्या मामाला व्हिडीओ कॉल केला. बिथररेल्या अवस्थेत थरथरत त्यानं आपल्या मामाशी संवाद साधला. भाच्याचे ‘मामा, बघा ना आईनं गळफास घेतला!’ हे शब्द ऐकून मामालाही धक्का बसला. या घटनेची माहिती मिळताच मामानं त्वरित या घटनेची माहिती नागपूर पोलिसांना दिली आणि घटनास्थळी धाव घेतली.

    हृदयाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. मृत प्रेरणा यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली नाही. त्यामुळे आत्महत्येमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. याप्रकरणी पोलिसांनी आसपास शेजारच्यांचे जाब नोंदवायला सुरुवात केली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास नागपूर पोलीस करत आहेत.