लॉकडाऊनच्या घोषणेनंतर नागपूरच्या बाजारपेठांत तुडुंब गर्दी, कसा कमी होणार कोरोना?

नागपूरमध्ये कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे येत्या १५ मार्चपासून लॉकडाऊन सुरू होणार आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यावर दुकाने बंद होतील आणि आपल्याला खरेदी विक्री करता येणार नाही, या भीतीने नागरिकांनी बाजारपेठांत सध्या प्रचंड गर्दी केल्याचं चित्र नागपूरमध्ये दिसलं. नागपूरमधल्या कापसाच्या बाजारपेठेत झालेली गर्दी पाहता कोरोना नियमांचं ढळढळीत उल्लंघन होत असल्याचं चित्र दिसलं. 

  गेल्या काही आठवड्यांपासून कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांत अंशतः लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. नागपूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे तिथे लॉकडाऊनचा निर्णय घोषित करण्यात आलाय.

  नागपूरमध्ये कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे येत्या १५ मार्चपासून लॉकडाऊन सुरू होणार आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यावर दुकाने बंद होतील आणि आपल्याला खरेदी विक्री करता येणार नाही, या भीतीने नागरिकांनी बाजारपेठांत सध्या प्रचंड गर्दी केल्याचं चित्र नागपूरमध्ये दिसलं. नागपूरमधल्या कापसाच्या बाजारपेठेत झालेली गर्दी पाहता कोरोना नियमांचं ढळढळीत उल्लंघन होत असल्याचं चित्र दिसलं.

  लोकांनी गर्दी केल्यामुळे आणि कोरोनाचे निकष न लावल्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढत चाललीय. त्यासाठी खरं तर लॉकडाऊन लावण्याची वेळ प्रशासनावर आलीय. मात्र लॉकडाऊन लावण्याचा जो मूळ उद्देश आहे, त्यालाच नागपूरकर हरताळ फासत असल्याचं चित्र आहे. कापूस बाजारात खरेदी आणि विक्रीचे व्यवहार उरकून घ्यावेत आणि लॉकडाऊनच्या काळात हाताशी पैसा असावा, या उद्देशाने कापूस बाजारपेठ माणसांनी फुलून गेली होती.

  नागपूरमध्ये १५ मार्चपासून म्हणजेच सोमवारपासून लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जाणार आहे. या काळात सर्व व्यवहार आणि बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. वाढत्या कोरोना रुग्ण संख्येने प्रशासनाची झोप उडवली आहे. अखेर नागपुरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. १५ मार्चपासून ते २१ मार्चपर्यंत नागपुरात कडक लॉकडाऊनची घोषणा नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी केली आहे.

  विदर्भात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. अमरावतीमध्ये लॉकडाऊन झालानंतर आता नागपुरातही लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. पालकमंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांच्या अध्यक्षतेखाली नागपुरातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर नागपुरात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

  मागील काही दिवसांपासून नागपुरात कोरोना रुग्णांचा आकडा सातत्यानं वाढत आहे. बुधवारी नागपुरात एकाच दिवसात १७१० नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.