Union Minister for Road Transport and Highways Gadkari's convoy crashed; The truck struck nrvk

नितीन गडकरी सोनेगाव तलाव सौंदर्यीकरणाच्या भूमिपूजनासाठी गेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर सात वाहनांच्या ताफ्यासह ते घरी रवाना झाले. छत्रपती चौकातील सिग्नल लागल्याने ट्रक चालकाने अचानक ब्रेक लावला. त्यामुळे गडकरींच्या ताफ्यात सर्वात पुढे असलेले एमएच०१-सीपी-२४३५ हे वाहन ट्रकच्या मागील बाजूला धडकले. अपघातात ताफ्यातील कारच्या समोरील भागाचे नुकसान झाले. मात्र कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.

    नागपूर : केंद्रीय केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी नागपुरात सोनेगाव तलाव सौंदर्यीकरणाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमातून परत येताना सात वाहनांच्या ताफ्यातील सर्वात पुढची कार ट्रकवर धडकून अपघात झाला. मात्र, त्यात कुणालाही दुखापत झाली नसल्याचे सर्वजण थोडक्यात बचावले आहेत. अपघाताची पाहणी करून गडकरी निवासस्थानी रवाना झाले. शनिवारी रात्री ही घटना घडली आहे.

    नितीन गडकरी सोनेगाव तलाव सौंदर्यीकरणाच्या भूमिपूजनासाठी गेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर सात वाहनांच्या ताफ्यासह ते घरी रवाना झाले. छत्रपती चौकातील सिग्नल लागल्याने ट्रक चालकाने अचानक ब्रेक लावला. त्यामुळे गडकरींच्या ताफ्यात सर्वात पुढे असलेले एमएच०१-सीपी-२४३५ हे वाहन ट्रकच्या मागील बाजूला धडकले. अपघातात ताफ्यातील कारच्या समोरील भागाचे नुकसान झाले. मात्र कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.

    अपघाताचा जोरदार आवाज झाल्याने सुरक्षा रक्षकही वाहनातून बाहेर आले. तसेच पादचाऱ्यांनीही त्या दिशेने धाव घेतली. घटनेची माहिती घेत नितीन गडकरी आपल्या घरी रवाना झाले. या अपघाताची माहिती मिळताच प्रतापनगर आणि धंतोली पोलिसांचा ताफा छत्रपती चौकाकडे धावला.

    दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या ताफ्यातील ३ गाड्यांना काही दिवसांपूर्वीच अपघात झाला होता. राज्यपाल कोश्यारी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना नरसी नामदेवकडे जाताना त्यांच्या ताफ्यातील ३ गाड्यांना अपघात झाला होता. या अपघातात ३ गाड्यांचे किरकोळ नुकसान झाले होते, तर कुणालाही गंभीर इजा झाली नव्हती. तर काही दिवसांपूर्वी राज्यमंत्री संजय मामा भरणे यांच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात झाला होता. तर गडकरी यांचा राज्यात मंत्री असतानाही कुटूंबियासह मोठा अपघात झाला होता त्यात त्यांना मार लागला होता मात्र ते थोडक्यात बचावले होते.