Universities will start only after September; UGC concerned about student's campus attendance

कोरोनामुळे युनिव्हर्सिटी कॅम्पस किती काळ बंद राहणार? या प्रश्नाच्या उत्तरासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदचे (आयसीएमआर ) संचालक बलराम भार्गव, एम्सचे डॉ. रणदीप गुलेरिया, जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्य सदस्या सौम्या स्वामीनाथन यांच्यासह असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजचे अनेक तज्ज्ञ आणि कुलगुरूंसह कार्यशाळा घेऊन नियमावली तयार करण्याचे ठरविले आहे.

  नागपूर : ‘विद्यापीठे उघडण्यासाठी कोणतीही तारीख निश्चित केलेली नाही, परंतु ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून विद्यापीठे काही वर्गांसाठी उघडली जातील. तथापि यापूर्वी, कॅम्पसमध्ये कोरोना रोखण्यासाठी गाइडलाइन तयार केल्या जातील.’असा तोडगा सध्या पुढे आला आहे.

  कोरोनामुळे युनिव्हर्सिटी कॅम्पस किती काळ बंद राहणार? या प्रश्नाच्या उत्तरासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदचे (आयसीएमआर ) संचालक बलराम भार्गव, एम्सचे डॉ. रणदीप गुलेरिया, जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्य सदस्या सौम्या स्वामीनाथन यांच्यासह असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजचे अनेक तज्ज्ञ आणि कुलगुरूंसह कार्यशाळा घेऊन नियमावली तयार करण्याचे ठरविले आहे.

  देशात केंद्रीय, राज्य, डीम्ड, खासगी अशी 986 विद्यापीठे असून, जवळपास 4 कोटी विद्यार्थी आहेत. सॅनिटाइजेशन, मास्किंग, सामाजिक अंतर हे विद्यापीठाच्या निकषांमध्ये समाविष्ट केले गेले आहेत, परंतु जेव्हा सर्व विद्यार्थी कॅम्पसमध्ये असतील तेव्हा खरे आव्हान राहणार असलयाने चिंता वाढली आहे. कॅम्पसमध्ये ऑक्सिजन प्लँट असावा, अशी सूचना पुढे आली असून, त्यासाठीचा खर्च कोणी करावा यावर एकमत झालेले नाही.

  निवडक उपाय

  • ऑनलाइन आणि ऑफलाइन अभ्यासाचे मिक्स मॉडेल अवलंबले जाईल.
  • ज्या विद्यार्थ्यांचे प्रॅक्टिकल असलेले विषय आहेत किंवा ज्यांना क्लास रुम टीचिंग आवश्यक आहे त्यांना कॅम्पसमध्ये बोलावले जाऊ शकते आणि उर्वरित विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन वर्ग सुरु ठेवता येतील.
  • ब्लेंडेड मेथड अंतर्गत व्हिडिओ लेक्चर्स, पॉडकास्ट, ऑनलाइन मटेरियलसुद्धा विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

  'कॅम्पस उघडल्यावर विद्यार्थ्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंग ठेवणे ही सर्वात मोठी समस्या असेल. म्हणूनच, कॅम्पस उघडल्यावरही सर्व विद्यार्थ्यांना एकत्र बोलावले जाऊ शकत नाही. अशावेळी शिक्षणाची ब्लेंडेड मेथड वापरली जाईल.

  -पंकज मित्तल, अतिरिक्त सचिव, यूजीसी