…तोपर्यंत बियाणांची पेरणी करु नये; कृषी विभागाचा शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला

शेतकऱ्यांनी दुबार पेरणीचं संकट टाळण्यासाठी काही काळ धीर धरावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलं आहे. खरीप पिकांच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांनी तयारी सुरु केली. मात्र हवामान खात्याने नागपुरात जूनपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तोपर्यंत बियाणांची पेरणी करु नये, असं कृषी विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

    नागपूर : कृषी विभागाने शेतकऱ्यांना अत्यंत महत्वाचा सल्ला दिला आहे. राज्यात अतिवृष्टीचीशक्यता आहे. त्यामुळे घाईघाईने बियाणे पेरल्यास ते वाया जाऊ शकतं. त्यामुळे शेतकऱ्यांनी दुबार पेरणीचं संकट टाळण्यासाठी काही काळ धीर धरावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलं आहे. खरीप पिकांच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांनी तयारी सुरु केली. मात्र हवामान खात्याने नागपुरात जूनपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तोपर्यंत बियाणांची पेरणी करु नये, असं कृषी विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

    दरम्यान खरीप पिकांच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांनी तयारी सुरु केली. मात्र हवामान खात्याने नागपुरात जूनपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तोपर्यंत बियाणांची पेरणी करु नये, असं कृषी विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

    मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. तर सिंधुदुर्गात ढगफुटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे लोकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. 30 ते 40 किलोमीटर वादळी वाऱ्यासह मध्यम ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नागरिकांना झाडाखाली उभे राहू नये. तसेच बाहेर पडताना काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात येत्या चार-पाच दिवसांत अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे.