विदर्भात पारा ४० अंशाच्या पार; अकोला ठरले सर्वात ‘हॉट’ शहर

नागपुरात तापमान फेब्रुवारीच्या अखेरीस वाढायला सुरुवात झाली होती. पारा ४० अंश सेल्सिअसपर्यंत जात असतानाच सलग तीन दिवस अवकाळी पाऊस कोसळला.

    नागपूर. विदर्भात आज उन्हाचा तडाखा जाणवला. उपराजधानीसह सात जिल्ह्यांमधील तापमान ४० अंश सेल्सिअसहून अधिक असून सर्वाधिक तापणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यात रविवारी ४२.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले तर अकोला आज सोमवारी ४२.८ अंश सेल्सिअसह विदर्भातले सर्वाधिक हॉट शहर ठरले.

    नागपुरात तापमान फेब्रुवारीच्या अखेरीस वाढायला सुरुवात झाली होती. पारा ४० अंश सेल्सिअसपर्यंत जात असतानाच सलग तीन दिवस अवकाळी पाऊस कोसळला. वादळीवाऱ्यासह आलेल्या या पावसामुळे वातावरणात बदल झाला आणि तापमानात मोठी घट झाली. मात्र, आता पुन्हा एकदा तापमानाचा पारा चढू लागला आहे